शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

शरीरापासून डोके वेगळे असलेल्या मजुराचा मृतदेह झुडपात आढळला, घातपाताची शक्यता 

By नरेश रहिले | Updated: July 5, 2023 20:03 IST

रेल्वे रुळापासून ३५ फूट दूर अंतरावरील झुडपात शरीरापासून डोके नसलेला मृतदेह ४ जुलै रोजी दुपारी ३ वाजता आढळला.

गोंदिया : रेल्वे रुळापासून ३५ फूट दूर अंतरावरील झुडपात शरीरापासून डोके नसलेला मृतदेह ४ जुलै रोजी दुपारी ३ वाजता आढळला. मृतदेहाचे डोके वेगळे, जबडा वेगळा आणि धड झाडाच्या झुडपात आढळले. त्यामुळे घातपाताची शक्यता वर्तविली जात आहे. या घटनेसंदर्भात रामनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, तरी घातपाताच्या दृष्टीने तपास सुरू आहे. भोजराज दयाराम मते (वय ३२, रा. मौदा, ता. किरणापूर, बालाघाट) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या राजाभाऊ कॉलनी गोंदिया ते बालाघाट जाणाऱ्या रेल्वे रुळालगत एक नाला आहे. 

या नाल्याजवळ ३० ते ३५ वर्षे वयोगटातील एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. रेल्वे खांब क्रमांक १००४/१० च्या मध्ये रेल्वे ट्रॅकपासून ३५ फूट लांब झुडपात नाल्याच्या बाजूला एक इसमाचा मृतदेह आढळला. त्या मृतदेहाचे धड एका झाडाच्या झुडपात आढळले. त्या धडापासून डोके आणि जबडा वेगळ्या ठिकाणी पडलेला आढळला. हा प्रकार घातपात असण्याची दाट शक्यता आहे. भोजराज दयाराम मते हे नागपूरच्या एमआयडीसीमध्ये काम करीत होते. ते नागपूरवरून गावाला जाण्यासाठी गोंदियाला आले. परंतु, ते गावाला जाऊच शकले नाही. त्यांच्या गावाच्या रेल्वे रुळाच्या झुडपात त्यांचा मृतदेह आढळला. या घटनेसंदर्भात गौरीशंकर सुरजलाल पारधी (वय ४३, रिंग रोड गोंदिया) यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तपास पोलिस हवालदार भोंडे करीत आहेत. मृतदेह कुजलेल्या अवस्थेतमागील आठ दिवसांपूर्वीपासून तो मृतदेह पडून असल्याने कुजलेल्या स्थितीत आढळला. गावाला जाण्यासाठी निघालेल्या भोजराज दयाराम मते हे घरी पोहोचलेच नाहीत. त्यांचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत नातेवाइकांच्या हातात लागला. रेल्वेने अपघात झाल्याचा भासविण्याचा प्रयत्न ?गोंदिया-बालाघाट रस्त्यावरील रेल्वे रुळावर अपघात झाल्याचे भासविता यावे म्हणून अज्ञात आरोपींनी घातपात करून मृतदेह ३५ फूट लांब झाडाच्या झुडपात टाकण्यात आला. या प्रकरणाची चौकशी रामनगर पोलिस करीत आहेत. 

टॅग्स :gondiya-acगोंदियाDeathमृत्यू