शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरील खड्ड्यांसाठी आमगाववासीयांचे रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 05:00 IST

अर्धवट रस्ता बांधकामामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. दोन दिवसांपूर्वीच या मार्गावर एका महिलेचा बळी गेला, तर आता पावसाळ्याला सुरुवात झाली असून रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कंत्राटदाराला रस्त्याचे काम त्वरित सुरू करून खड्डे बुजविण्याची विनंती नागरिकांनी अनेकदा केली; पण त्याची कंत्राटदाराने दखल घेतली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या आमगाववासीयांनी गुरुवारी सकाळी या मागणीला घेऊन कामठा ते लांजी मार्गावर आंदोलन केले.

ठळक मुद्देचार महिन्यांपासून समस्या : तहसीलदारांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे, दीड तास चालले आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव :  मागील चार महिन्यांपासून आमगाव-देवरी मार्गाच्या सिमेंटीकरणाचे काम सुरू आहे. रस्ता बांधकामासाठी कंत्राटदाराने ठिकठिकाणी खड्डे खोदून ठेवले आहेत. यामुळे वाहतुकीची कोंडी होत असून, पावसाळ्याला सुरुवात झाली असल्याने अपघातांची शक्यता बळावली आहे. वांरवार खड्डे बुजविण्याची मागणी करूनसुद्धा कंत्राटदाराने लक्ष न दिल्याने आमगाव येथील नागरिकांनी गुरुवारी (दि. २४) कामठा ते लांजी मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. जवळपास एक ते दीड तास हे आंदोलन सुरू होते. तहसीलदारांनी रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.आमगाव-देवरी मार्गाच्या सिमेंटीकरणाचे काम मागील चार महिन्यांपासून शिवालया कन्स्ट्रक्शन कंपनीकडे आहे. मात्र, या कंपनीने रस्त्याचे काम सलग न करता तुकड्या तुकड्यांत केले आहे. त्यातच या मार्गावर ठिकठिकाणी अर्धवट काम केले असल्याने आणि त्यासाठी खड्डे खोदून ठेवल्याने या मार्गावर सातत्याने अपघात होत आहेत. शिवाय अर्धवट रस्ता बांधकामामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. दोन दिवसांपूर्वीच या मार्गावर एका महिलेचा बळी गेला, तर आता पावसाळ्याला सुरुवात झाली असून रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कंत्राटदाराला रस्त्याचे काम त्वरित सुरू करून खड्डे बुजविण्याची विनंती नागरिकांनी अनेकदा केली; पण त्याची कंत्राटदाराने दखल घेतली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या आमगाववासीयांनी गुरुवारी सकाळी या मागणीला घेऊन कामठा ते लांजी मार्गावर आंदोलन केले. या आंदोलनामुळे काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे दंगा नियंत्रण पथकालासुद्धा घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. दरम्यान, तहसीलदार दयाराम भोयर यांनी घटनास्थळी दाखल होत आंदोलकांची समजूत काढली. तसेच शिवालया कंपनीच्या कंत्राटदाराला त्वरित कामाला सुरुवात करण्याचे निर्देश दिले. त्यांनी त्वरित खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात केली. त्यामुळे आंदोलक शांत झाले. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय बहेकार, भारतीय विद्यार्थी संघटनेचे तालुका अध्यक्ष राजीव फुंडे, शंभू प्रसाद अग्रिका, पोलीस निरीक्षक व्ही. के. नाळे यांनी मध्यस्थाची भूमिका पार पडली.  आंदोलनात सुरेश बोपचे, सुरेश उपलपवार, मुकेश अग्रवाल, बी. एल. बोपचे, कैलाश गौतम, सुशील पारधी, छत्रपाल मच्छिया, शालिकराम येळे, रामेश्वर नागपुरे, शिवाजी वलथरे, शिव लिल्हारे, सुखराम कटरे, नरेश ठाकरे, संजय बरय्या, विजय बरय्या, शुभम गुप्ता, श्रावण शिवणकर, नथूलाल गौतम, गोपाल अग्रवाल, दुर्गेश येटरे, बालू येटरे, विलास टेंभरे, अजय दोनोडे, आदी सहभागी झाले होते. 

रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात आमगाव येथील रस्त्यावरील खड्ड्यांचे वृत्त गुरुवारी प्रकाशित होताच आमगाववासीयांनी याची दखल घेत आंदोलनाचा पवित्रा घेतला. दीड तासाच्या रास्ता रोको आंदोलनानंतर कंत्राटदाराने रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला त्वरित सुरुवात केली. त्यामुळे आमगाव शहरवासीयांना दिलासा मिळाला.

 

टॅग्स :agitationआंदोलनhighwayमहामार्ग