शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी वसतीगृहाकरीता ओबीसी संघटनांचे गोंदियात भीक मांगो आंदोलन

By अंकुश गुंडावार | Updated: September 21, 2023 14:56 IST

गोळा झालेला निधी मनिआर्डरच्या माध्यमातून राज्य सरकारला पाठविला

गोंदिया : मागील 6 वर्षांपासून ओबीसी विद्यार्थ्यांच्या 72 वसतीगृहाचा विषय शासनाने अजूनही सोडवला नाही.राज्य शासनाचा वित्त विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग आताही गंभीर नाही. यामुळे पुन्हा एकदा ओबीसी विद्यार्थी वसतिगृहे आणि आधार योजनेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आज 21 सप्टेंबरला गोंदियातील जयस्तंभ चौक परिसरात भीक मांगो आंदोलन करुन गोळा झालेला निधी मनिआर्डरच्या माध्यमातून राज्य सरकारला पाठविला.

शाळा महाविद्यालये सुरू होवून 3 महिने उलटले आहेत तरी 7200 विद्यार्थ्यांसाठी 72ओबीसी वसतिगृहे, 21600 विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले आधार योजना, 75 विद्यार्थ्यांसाठी विदेश शिष्यवृत्ती योजना यावर निर्णय झालेला असतांना अजूनही वरील योजना शासनाने सुरू केल्या नाहीत.वरील योजना महाराष्ट्र शासनाच्या वित्त व बहुजन कल्याण विभागाने अडवून ठेवल्या आहेत. चालढकल करत शासन ओबीसी समाजावर अन्याय करत आहे. 52 टक्क्यांच्या वर असलेल्या कष्टकरी, अन्नदाता समाजाची शासनाला पर्वा नाही. शासनाकडे ओबीसी विद्यार्थ्यांच्या हितासाठी निधी नाही. या सर्व बाबींचा निषेध करण्यासाठी भीक मांगो आंदोलनाच्या माध्यमातून सरकार साठी भीक मांगो आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात ओबीसी अधिकार मंचचे सयोंजक खेमेंद्र कटरे,ओबीसी संघर्ष समितीचे अशोक लंजे,कैलास भेलाावे,शिशिर कटरे, सुधीर ब्राम्हणकर, संविधान मैत्री संघाचे अतुल सतदेवे, युवा बहुजन मंचचे सुुनिल भोंगाडे, पिछडा शोषित संघटनेचे प्रेमलाल साठवणे, मोहसिन खान, उमेश कटरे, रवी भांडारकर, रवी सपाटे महेंद्र बिसेन मुनेश्वर कुकडे, प्रमोद गुडधे, हरिष मोटघरेसह ओबीसी व्हीजेएनटी एसबीसी समुहातील सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते.

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जातीagitationआंदोलनgondiya-acगोंदिया