शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

बावनकुळे, फुकेंच्या शिस्तबद्ध बांधणीने मेंढे पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 22:35 IST

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुनील मेंढे यांचा तब्बल १ लाख ९७ हजार विक्रमी मतांनी विजय झाला. त्यांच्या विक्रमी विजयामागे खरी भूमिका होती ती राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आ.डॉ.परिणय फुके यांची.

ठळक मुद्देसंडे अँकर । मतदारांपर्यंत सरकारच्या योजना पोहोचविण्यात यश, अडीच महिन्यांचे नियोजन आले कामी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुनील मेंढे यांचा तब्बल १ लाख ९७ हजार विक्रमी मतांनी विजय झाला. त्यांच्या विक्रमी विजयामागे खरी भूमिका होती ती राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आ.डॉ.परिणय फुके यांची. निवडणुकीच्या काळात अडीच महिने त्यांनी मतदारसंघात तळ ठोकून केलेली पक्ष बांधनी आणि भाजप सरकारने केलेल्या विकास कामांचे योग्य मार्केटिंग केल्यामुळेच मेंढे यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला. एकंदरीत बावनकुळे आणि मेंढे यांनी निवडणुकी दरम्यान केलेली शिस्तबध्द बांधणी व नियोजन केल्याने मेंढे यांना विक्रमी मताधिक्य मिळविता आले.पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने जिंकलेली भंडारा-गोंदिया लोकसभेची जागा भाजपाने पुन्हा आपल्या पदरात पाडून घेतली. यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार डॉ. परिणय फुके यांचे यशस्वी नियोजन महत्त्वपूर्ण ठरले. आता त्यांचे लक्ष मतदार संघातील सहाही विधानसभेकडे लागले आहे.भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पहिल्यांदाच नवख्या उमेदवारांना रिंगणात उतरविले होते. सुरुवातीला विधान परिषदेचे आमदार डॉ.परिणय फुके यांच्या नावाची चर्चा होती. मात्र त्यांनी भंडाराचे नगराध्यक्ष सुनील मेंढे यांना उमेदवारी देण्याची आग्रही मागणी केली. एवढेच नाही तर त्यांना विजयी करण्याची जबाबदारी घेत वरिष्ठांनाही खात्री करुन दिली. त्यावरूनच भाजपने भंडाराचे नगराध्यक्ष सुनील मेंढे यांना उमेदवारी दिली. तर राष्ट्रवादीने माजी शिक्षण राज्यमंत्री नाना पंचबुद्धे यांना मैदानात उतरविले. भाजपाने सुरुवातीपासूनच नियोजनबद्ध पद्धतीने भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात प्रचार यंत्रणा राबविली. गोंदिया जिल्ह्यातील प्रचाराची धुरा आमदार डॉ.परिणय फुके यांनी तर राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे भंडाराचे पालकमंत्री असल्याने त्यांच्यावर जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आली. या दोघांनीही भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने प्रचाराचे नियोजन केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभांचेही उत्कृष्ट नियोजन करून तेथे गर्दी खेचून आणण्यात यश मिळविले.त्याचाच परिणाम लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाच्या विजयात झाला. विशेष म्हणजे मतदारसंघातील सहाही विधानसभा क्षेत्रात भाजपलाच आघाडी मिळाली.शहरी आणि ग्रामीण भागातही मतदारांना आकर्षीत करण्यात भाजपला यश आल्याचे या लोकसभेच्या निवडणुकीत दिसून येत आहे. सुनील मेंढे यांच्या विजयात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार डॉ.परिणय फुके यांचा सिंहाचा वाटा आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने या निवडणुकीत मन लावून काम केल्याने भाजपला ही निवडणूक सोपी झाली. आता या विजयाने भाजपचा आत्मविश्वास वाढला असून मतदारसंघातील सहाही विधानसभा जिंकण्याचा त्यांनी मनोदय केला आहे.कार्यकर्त्यांशी योग्य समन्वयपालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार डॉ.परिणय फुके यांनी प्रचारादरम्यान संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. मतदारांशी थेट संपर्क वाढविला. भाजपच्या विकासात्मक योजनांची माहिती त्यांनी गावागावांत दिली. नागरिकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद त्यांना मिळत गेला. मतदानाच्या दिवशी सुद्धा बुथनिहाय कार्यकर्त्यांना कामाला लावले. अधिकाधिक मतदान कसे करता येईल याकडे त्यांनी लक्ष दिले. परिणामी सुनील मेंढे यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला. त्यांच्याच प्रयत्नांमुळेच मतदारसंघातील सहाही विधानसभा क्षेत्रात आघाडी घेतली. भाजपची प्रचार यंत्रणा तशी सक्षमच होती. मात्र पालकमंत्री बावनकुळे आणि आमदार फुके यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणीत केला. कार्यकर्त्यांनी शेवटपर्यंत मन लावून प्रचार केला.भाजपला मिळालेल्या यशाच्या विविध कारणात शिस्तबद्ध प्रचार हे महत्त्वाचे कारण होय.

टॅग्स :Lok Sabha Bypoll Results 2018लोकसभा पोटनिवडणूक निकाल 2018BJPभाजपा