शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

ब्युटीपार्लरसाठी मिळणार अडीच लाख; १५ टक्के सबसिडीचा घेता येईल फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 17:14 IST

लघु उद्योगांच्या उत्थानासाठी प्रयत्न : जिल्हा उद्योग केंद्रात प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यात सूक्ष्म व्यवसाय किंवा उद्योग सुरू करण्यासाठी दीड लाख रुपयांपासून ते अडीच लाखांपर्यतची रक्कम सुशिक्षित बेरोजगारांना बँकेच्या माध्यमातून कर्ज स्वरूपात अर्थसाहाय्य दिले जाते.

यात शासनाद्वारे १५ टक्क्यांपर्यंत सबसिडीने उपलब्ध करून दिली जाते. या योजनेचा सर्वाधिक लाभ महिलांनी ब्युटीपार्लर, तर पुरुषांनी सलून टाकण्यासाठी घेतला आहे. यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या नावे ऑनलाइन अर्ज, एक पासपोर्ट फोटो, आधार कार्ड, जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, प्रकल्प अहवाल, पॅन कार्ड ही कागदपत्रे या प्रस्तावासाठी तयार करून घेणे आवश्यक आहेत. 

मंजुरीसाठी पाठपुरावा जिल्हा उद्योग केंद्राकडून नवउद्योजकांचे प्रस्ताव तातडीने मंजूर करण्यात येतात. हे प्रस्ताव पुढे कर्ज प्रकरणासाठी बँकांकडे जातात. डीआयसीकडून पाठपुरावा केला जातो. डाळ मिल, ऑइल मिल, बेकरी उत्पादन, गूळ उत्पादन, विविध प्रकारचे मसाले तयार करणे, दागिने तयार करणे यांसह इतर उत्पादनांचा समावेश होतो. यासाठी पाठपुरावा केला जात आहे.

जिल्ह्यातून अनेक प्रस्ताव गोंदिया जिल्हा उद्योग केंद्राला मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमासाठी टार्गेट दिले आहे.

अडीच लाखांपर्यंत कर्ज या प्रस्तावांसाठी दीड लाखापासून ते अडीच लाखांपर्यंत विविध प्रस्ताव जिल्हा उद्योग केंद्राकडे प्राप्त झालेले आहेत. मार्च अगोदर हे प्रस्ताव बँका मंजूर करतील, अशी अपेक्षा व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

१५ टक्के शासनाची सबसिडी नवीन उद्योजकांना केवळ दहा टक्के रक्कम भरावी लागते. उर्वरित शासनाकडून देय अनुदान १५ टक्के आणि ७५ टक्के हे बँक कर्ज, अशा पद्धतीने प्रकल्प उभा राहतो. ग्रामीण भागासाठी लाभार्थीला दहा टक्के रक्कम भरावी लागणार, १५ टक्के शासकीय अनुदान, तर ६५ टक्के बँकेचे कर्ज राहणार आहे.

ब्युटीपार्लर, सलूनचेही सर्वाधिक प्रस्ताव शहर व जिल्ह्यात ब्युटीपार्लरचे प्रस्ताव महिलांनी सादर केले आहेत, तर सलूनसाठी प्रस्ताव पुरुषांनी सादर केले आहेत. 

टॅग्स :MONEYपैसाgovernment schemeसरकारी योजनाgondiya-acगोंदिया