शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
6
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
7
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
8
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
9
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
10
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
11
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
12
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
13
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
14
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
15
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
16
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
17
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
18
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
19
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
20
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS

प्रतिमा डागाळण्याआधी सावध व्हा!

By admin | Updated: December 27, 2016 02:15 IST

गेल्या बुधवारी गोंदियातल्या हॉटेल बिंदल प्लाझा व त्यातील ठाट-बाट या रेस्टॉरेंटला लागलेल्या आगीने सात

मनोज ताजने ल्ल गोंदिया गेल्या बुधवारी गोंदियातल्या हॉटेल बिंदल प्लाझा व त्यातील ठाट-बाट या रेस्टॉरेंटला लागलेल्या आगीने सात लोकांचा बळी घेतला. एवढ्या गंभीर घटनेनंतर सहावा दिवस उजाडला तरी या प्रकरणात पोलिसांनी कोणावरही ठपका ठेऊ नये, ही बाब सर्वांनाच आश्चर्यात टाकणारी आहे. विशेष म्हणजे एरवी एखाद्या छोट्यामोठ्या दुर्घटनेनंतर तावातावाने ‘संबंधित दोषींवर कडक कारवाई झालीच पाहीजे’ असे ठणकावून सांगणाऱ्या जिल्ह्यातील एखाद्या नेत्याचे मन या दुर्घटनेतील सात जणांच्या मृत्यूनेही हेलावू नये? म्हणजेच यात कुठेतरी पाणी मुरत आहे हे स्पष्ट आहे! सर्व विभागांकडून येत असलेल्या माहितीत या दुर्घटनेसाठी हॉटेल संचालकाचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे. हे हॉटेल भाजपच्या एका जुन्या पण मर्यादित विश्वात राहणाऱ्या पदाधिकाऱ्याचे व त्याच्या नातेवाईकाचे आहे. राजकारणाला व्यवसाय मानणाऱ्यांपैकी एक असलेल्या या नेत्याचा जनमानसाशी फारसा संबंध नाही. त्यामुळे अशा नेत्यापासून भाजपला काय फायदा आहे हा संशोधनाचा विषय असला तरी पक्षाचा उपयोग आपल्या फायद्यासाठी कसा करून घ्यायचा हे मात्र अशा नेत्यांना चांगले माहीत आहे. त्यामुळेच एवढी गंभीर घटना होऊनही आणि अनेक बाबतीत नियम डावलूनही हॉटेलच्या संचालकावर कोणतीही कारवाई अद्याप झालेली नाही. हॉटेलच्या मुदतबाह्य परवान्यापासून तर बांधकाम आणि फायर आॅडिटपर्यंत अनेक गोष्टींची इमानदारीने तपासणी केल्यास हॉटेल संचालकावर कडक कारवाई करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पत्रकारांना माहिती देताना या हॉटेलने अनेक नियम तोडल्याचे संबंधित विभागाचे अधिकारी उघडपणे सांगत असताना पोलिसांपर्यंत मात्र त्यांचा आवाज गेल्या सहा दिवसातही पोहोचला नाही. पोलीस कारवाई करण्यास कचरत आहेत. तरीही कोणत्याही पक्षाचा लोकप्रतिनिधी पुढे येऊन कारवाई करा, म्हणून ठणकावून बोलताना दिसत नाही. एवढी सर्वांची मने निष्ठूर झाली आहेत का? असा प्रश्न आता गोंदियावासियांना पडत आहे. पालकमंत्री बडोले यांनी मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन करताना शहरातील सर्व व्यावसायिक इमारतींचे ‘फायर आॅडिट’ करण्याची सूचना केली. पण त्या सूचनेची तरी अंमलबजावणी गांभिर्याने होईल का, याबद्दलही शंका आहे. एवढी गंभीर घटना जर मुंबईसारख्या महानगरात घडली असती तर विरोधी पक्षवाल्यांनी राईचा पर्वत केला असता, पण गोंदियात वेगळीच परिस्थिती आहे. भाजप सरकार आपल्या एका (मास लिडर नसलेल्या) संघटनात्मक पदाधिकाऱ्याला वाचविण्यासाठी जर या घटनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करीत असेल तर ही बाब भाजपसाठीच घातक ठरणार आहे. नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर आपल्याच एका पदाधिकाऱ्यावर कारवाई होणे भाजपला नुकसानकारक वाटत असावे, पण खरे म्हणजे कारवाई झाल्याने होणाऱ्या बदनामीपेक्षा कारवाई न केल्याने होत असलेली बदनामी लोकांच्या मनात जास्त शंका निर्माण करीत आहे. भाजप सरकारला आगीत बळी पडलेल्या ७ लोकांच्या जीवापेक्षा आपल्या पदाधिकाऱ्याचे महत्व जास्त वाटते, असा बाऊ उद्या विरोधक करतील. यातून भाजपची प्रतिमा जास्त डागाळल्या जाणार आहे. पक्षवाढीत काहीही योगदान नसणाऱ्या पदाधिकाऱ्याला वाचविण्यात खरे तर कोणताही शहाणपणा नाही. उलट निष्पक्षपणे कारवाई करून ‘चूक करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला आम्ही सोडत नाही,’ असे छातीठोकपणे सांगण्याची संधी भाजप सरकारमधील पदाधिकाऱ्यांना आहे. ही संधी त्यांनी गमावू नये. नागरिकांना काही कळत नाही, चार दिवस लोक ओरडतील, मग माहौल शांत होईल आणि या प्रकरणावर पडदा पडेल, अशा भ्रमात कोणीही राहिले तर ती मोठी चूक ठरणार आहे. कारण या आगीची धग एवढ्या लवकर शांत होणारी नाही, हे वेळीच लक्षात घेणे गरजेचे आहे.