शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यातील मामा तलावांनी गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 21:48 IST

तालुक्यात एकूण १६१ मामा तलाव असून यापैकी अनेक तलावातील पाणी वाढत्या तापमानामुळे आटत आहे. त्यामुळे हे तलाव सुध्दा पूर्णपणे कोरडे पडण्याची शक्यता असून पाणी टंचाईच्या समस्येत वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या स्थिती मामा तलावांमध्ये सरासरी २० टक्के पाणी शिल्लक आहे.

ठळक मुद्दे२० टक्के पाणी साठा : लघु पाटबंधारे तलावांची तीच स्थिती

विजय मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : तालुक्यात एकूण १६१ मामा तलाव असून यापैकी अनेक तलावातील पाणी वाढत्या तापमानामुळे आटत आहे. त्यामुळे हे तलाव सुध्दा पूर्णपणे कोरडे पडण्याची शक्यता असून पाणी टंचाईच्या समस्येत वाढ होण्याची शक्यता आहे.सध्या स्थिती मामा तलावांमध्ये सरासरी २० टक्के पाणी शिल्लक आहे. काही तलावानी तर तळ गाठणे ही सुरु केले आहे. पावसाळ्याला सुरूवात होण्यास अजून महिनाभराचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे तोपर्यंत या तलावात पाणी साठा शिल्लक राहणार की नाही हे सांगणे मात्र अवघड आहे.विशेष म्हणजे यंदा तापमानात सुध्दा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी तलावातील पाण्याचे लवकर बाष्पीभवन होवून पाणी साठा झपाट्याने घट होत आहे.तालुक्यात एकूण मामा तलावाची संख्या १६१ असून त्यांची एकंदरित पाणी साठवण क्षमता १४.३० दशलक्ष घनमिटर आहे. वर्तमान स्थितीत केवळ ३.५० दशलक्ष घन मिटर पाणी तलावात शिल्लक आहे.तालुक्यात प्रत्येक गाव शेजारी एक किंवा दोन मामा तलाव असून शेकडो गावाची जीवन दायीनी म्हणून मामा तलावाचा उपयोग पडतो. परंतु अनेक मामा तलावात आता ठणठणाट होण्याच्या मार्गावर असल्याने पाणी टंचाईच्या समस्येत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.मामा तलावातील पाण्याचा उपयोग जनावरांना पिण्याचे पाणी, जनावरे धुणे, कपडे धुणे यासह विविध बांधकाम आणि पिकांसाठी केला जातो. मात्र हे तलाव कोरडे पडल्यास पाणी टंचाईच्या समस्येत वाढ होत असते.पाझर तलावाची स्थिती चांगलीतालुक्यात एकूण चार पाझर तलाव असून त्यांची सिंचन क्षमता ३९ हेक्टर आहे. तर पाणी साठवण क्षमता ०.३१ घनमिटर आहे. पाझर तलावातून मागील खरीप हंगामात २२ हेक्टर शेतीला सिंचन करण्यात आले तरी वर्तमान स्थितीत ०.२० घन मिटर म्हणजे ६४ टक्के पाणी साठा उपलब्ध आहे.डागडुजीच्या नावावर वारेमाप खर्चलघु पाटबंधारे अंतर्गत तालुक्यात एकूण २९ तलाव असून त्यांची एकूण प्रकल्पीय साठा क्षमता ४.८८ दशलक्ष घनमीटर आहे. सध्या स्थितीत या तलावात केवळ १ घन मीटर पाणीसाठा शिल्लक आहे. बऱ्याच वर्षांपासून या तलावांची दुरूस्ती केली जात नसल्याने यात पाणी साचून राहण्याऐवजी सहज वाहून जात आहे. त्यामुळे तलावांचा कुठलाही उपयोग होत नसल्याचे चित्र आहे.सिंचन विभागाकडून दरवर्षी डागडुजीच्या नावावर कोट्यवधी रुपये खर्च केले सांगितले जाते. मात्र यानंतरही तलावांची तीच स्थिती कायम असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.दीड हजार हेक्टर शेतीचे सिंचनमागील खरीप हंगामात मामा तलाव आणि लघु पाटबंधारे (लपा) विभागाचे तलाव मिळून एकूण एक हजार ४२४ हेक्टर शेतीला सिंचन करण्यात आले. यामध्ये मामा तलावातून ११३० हेक्टरला लपा तलावातून २८.२ हेक्टरला आणि पाझर तलावातून २२ हेक्टर शेतीला सिंचन करण्यात आले. लपा तलावाची एकूण सिंचन क्षमता १६३०.५८ हेक्टर असून १७.३० टक्के पाण्याचा वापर सिंचनासाठी करण्यात आला. तर मामा तलावांची एकूण सिंचन क्षमता ३६३० हेक्टर असून ३१ टक्के पाण्याचा वापर करण्यात आला.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई