शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या पेन्शनच्या समर्थनार्थ झळकले नक्षल्यांचे बॅनर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 11:12 IST

आमगाव-सालेकसा मार्गावर सीपीआय माओवादी या नक्षल संघटनेचे बॅनर

गोंदिया : गेल्या आठवड्यात जुन्या पेन्शनच्या मुद्यावर राज्य सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांनी आंदोलन करून सरकारला जेरीस आणले होते. मात्र संघटनांच्या समन्वय समितीने संप मागे घेतल्याने जुन्या पेन्शनचा प्रश्न तसाच कायम राहिला. परंतु कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्यात यावी, या मागणीसाठी रविवारी (दि. २६) आमगाव-सालेकसा मार्गावर सीपीआय माओवादी या नक्षल संघटनेचे बॅनर लावण्यात आले आहे.

जुन्या पेन्शनला समर्थन असल्याचे नक्षलवाद्यांचे बॅनर असून यात नवीन पेन्शन योजना रद्द करण्यात यावी, ठेकेदारीकरण बंद करण्यात यावे, मेस्मा कायदा लागू करणारे शिंदे-फडणवीस सरकार मुर्दाबाद अशा अनेक घोषणा आहेत. सोबतच पत्रकदेखील काढलेले आहे. या पत्रकात महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड झोनल (माओवादी) कमिटीचे प्रवक्ता अनंत असे नाव लिहिलेले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnaxaliteनक्षलवादीgondiya-acगोंदिया