शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

एटीएमने पैसे काढण्यासाठी आता बँक घेणार २५ रुपये सेवा शुल्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 17:39 IST

Gondia : ३ नंतर प्रत्येक व्यवहारावर सेवाशुल्क, १८ टक्के जीएसटी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : एटीएममधून रोख रक्कम काढण्यासाठी आता तुम्हाला जास्तीचे सेवाशुल्क व त्यावर १८ टक्के जीएसटी द्यावी लागणार आहे, हे वाचून तुमच्या भुवया उंचावल्या असतील. कारण, आता एटीएम कार्डचा वापर करताना दहादा विचार करावा लागेल. काही बँका तर पासबुक भरल्यास नवीन पासबुकसाठी भरमसाट पैसे घेत आहेत. तुमचे खाते ज्या बँकेत आहे, त्या बँकेच्या एटीएममधून पाच वेळेस एटीएमचे व्यवहार विनाशुल्क असतील. एटीएमने कधीकाळी मोठ्या प्रमाणात पैशांची उलाढाल होत होती. परंतु, मागील काही वर्षापासून डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून व्यवहार केले जात आहेत. क्यूआर कोड आल्यामुळे व्यवहार डिजिटल झाले असले तरी रोख रक्कम काढण्यासाठी आजही एटीएमला पर्याय नाही. 

किती व्यवहारानंतर लागेल सेवाशुल्क ?

  • तुमचे ज्या बँकेत खाते व एटीएम आहे, त्या बँकेऐवजी दुसऱ्या बँकेची रोख रक्कम काढण्यासाठी ३ वेळेस सेवाशुल्क लागणार नाही. मात्र, त्यानंतर चौथ्या व्यवहारापासून पुढील प्रत्येक व्यवहारावर २१ रुपये सेवाशुल्क व त्यावर १८ टक्के जीएसटी असे २५ रुपये बँक वसूल करेल.
  • ज्या बँकेत तुमचे खाते आहे, त्याच बँकेच्या एटीएमवरून रोख रक्कम काढताना ५ वेळेस सेवाशुल्क लागणार नाही. मात्र, त्यानंतरच्या प्रत्येक व्यवहारावर २५ रुपये बँक वसूल करेल.
  • पूर्वीही एटीएममधून रक्कम काढल्यास सेवा शुल्क १७रुपये लागत असे. जीएसटीसह २० रुपये आकारले जात होते.

मिनिमम बॅलन्स नसेल तर लागेल दंड बँक                                कमीत कमी किती रक्कम ? बचत खाते                 दंडाची रक्कम (तीन महिने)बँक ऑफ महाराष्ट्र                  २०००                                                               १०० ते ३०० रु.बँक ऑफ बडोदा                    २०००                                                               १२० रु.स्टेट बँक ऑफ इंडिया             १०००                                                                दंड नाहीएचडीएफसी                          १००००                                                              ५० ते ६०० रु.कॅनरा बँक                             १०००                                                               ५० ते ३०० रु.

बँकांकडून सर्वसामान्यांची होतेय लूटसेवाशुल्काच्या नावाखाली बँका लुटत आहेत. मिनिमम बॅलन्सवर दंड, एटीएमवर व्यवहारावर सेवाशुल्क, चेक बाउन्स झाल्यास बँकांची दंडाची रक्कम एकसारखी पाहिजे. पण, बँका 'मेरी मर्जी' प्रमाणे वेगवेगळे दंड आकारत आहेत. खातेदार बँकेत पैसे ठेवतो म्हणजे गुन्हा करतो काय, असेच आता वाटत आहे. असे सेवाशुल्क दंड वसूल करून बँका नफा कमवीत आहेत. हे चुकीचे आहे. आरबीआयने यावर कठोर भूमिका घेतली पाहिजे.

टॅग्स :gondiya-acगोंदिया