शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

शेअरमध्ये नफ्याचे आमिष, नफ्याचे आमिष देऊन केली होती फसवणूक, ३ लाख ५६ रूपयांना गंडा 

By नरेश रहिले | Updated: February 19, 2024 18:46 IST

दिलीपकुमार सुभाष मटाले यांची शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक केली होती.

गोंदिया: शेअर बाजारातून जास्त नफा मिळवुन देतो असे आमिष दाखवुन ऑनलाईन वेगवेगळ्या फर्मच्या नावाने वेगवेगळ्या चालु बँक खाते उघडून त्यावर लोकांकडुन रक्कम घेत लोकांची फसवणूक करणाऱ्या मुंबई येथील आरोपीला आमगाव पोलिसांनी मुंबई अटक करून आणले. कल्पेश सतिश मिश्रा (३८) रा. सांताक्रुझ मुंबई असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

आमगाव तालुक्याच्या शिवणी येथील दिलीपकुमार सुभाष मटाले यांची शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक केली होती. यासंदर्भात आमगाव पोलीस ठाण्यात २६ जून २०२३ रोजी भादंविच्या कलम ४२०, ३४ सहकलम ६६ (क), ६६ (ड) माहीती तंत्रज्ञ अधिनियम २००० अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांच्याकडे होता. या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याकरीता आमगाव पोलीस पथक मुंबई करिता रवाना करण्यात आले होते. पोलीस पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत धायगुडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेंन्द्रे, पोलीस शिपाई साबळे हे मुंबई येथे गेले.

आरोपीचा शोध करीत असताना आरोपी हा वारंवार आपले मोबाईल क्रमांक बदलत असल्याने आरोपीचा शोध घेणे अवघड होते. पोलीस पथकाने वरिष्ठांनी दिलेल्या निर्देश सूचना मानवी कौशल्याचा वापर करुन व प्राप्त गोपनीय माहीती वरुन गुन्ह्यातील आरोपीचे तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीच्या माहितीचे विश्लेषन करुन शेअर मार्केटच्या नावाखाली जास्त नफा मिळवून देण्याचे आमीष दाखवून वेगवेगळ्या फर्मच्या नावाने वेगवेगळ्या चालु बँक खाते उघडुन त्यावर लोकांकडुन रक्कम प्राप्त करुन लोकांची फसवणूक केली. आरोपी कल्पेश सतिश मिश्रा (३८) रा. सांताकृझ मुंबई याला १८ फेब्रुवारी २०२४ रोजी सांताकृझ पोलीस ठाणे येथील पोलीस पथकाच्या मदतीने धाड घालून पहाटे ताब्यात घेतले. यांनी केली कारवाईया प्रकरणात पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधिक्षक नित्यानंद झा यांच्या निर्देशान्वये व मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील, पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत धायगुडे, शेंन्द्रे व पोलीस शिपाई साबळे यांनी केली आहे. अनेकांची केली फसवणूकआमगाव तालुक्याच्या शिवणी येथील दिलीपकुमार सुभाष मटाले यांची ३ लाख ५६ हजार ५७ रूपयाने फसवणूक करण्यात आली होती. याच बरोबर या आरोपीने अनेकांकडून पैसे लुबाडल्याचे पुढे येत आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदियाshare marketशेअर बाजार