शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

तेलाचा वारंवार वापर टाळा; २५ पोलार युनिटच्या आतच खाद्यतेल वापरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 16:08 IST

काळेकुट्ट होईपर्यंत तेलाचा उपयोग : आरोग्यासाठी धोकादायक

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : हॉटेलात तलाव तेलासाठी खाद्यतेल वारंवार वापरले जाते. परंतु, खाद्यतेल २५ पोलार युनिटवर वापरू नये, अशा सूचना प्रशासनाच्या असतानाही हॉटेलचालकांकडून तेल काळेकुट्ट होईपर्यंत वापरले जाते. या तेलातून तळलेले पदार्थ सेवन केल्यास ग्राहकांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागू शकते. खाद्यपदार्थ तळण्यासाठी वारंवार तेच तेल वापरले जात असेल तर अशा हॉटेलचालकांवर अन्न व औषधी प्रशासन विभागातर्फे कारवाई होत आहे.

हॉटेलचालकांनो, स्वतःच्या फायद्यासाठी वारंवार तेच तेल वापरू नका, अन्यथा आपण ग्राहकांना कर्करोगाच्या मुखात टाकाल. आपल्या व्यवसायासाठी ग्राहकांना वेठीस धरू नका, अन्यथा आपल्याला कारवाईस सामोरे जावे लागेल. दिवाळीच्या कालावधीत शहरात अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांनी विविध व्यावसायिक प्रतिष्ठानांची तपासणी केली. परंतु, या तपासणीचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे कारवाया करण्यास विलंब होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. तेलाचा पुनर्वापर आरोग्याला घातक ठरतो. समोसा, कचोरी व तेलात तळले जाणारे इतर पदार्थ यांसाठी वारंवार त्याच तेलाचा वापर होऊ नये. तेल २५ पोलार युनिटपर्यंतच वापरण्याची परवानगी शासनाने दिली आहे. त्यापेक्षा जास्त तेल वापरू नये. 

व्यावसायिकांनी विशेष सतर्कता बाळगावीहॉटेल व खाद्य दुकानचालकांनी वारंवार तेच तेल वापरू नये. ज्या हॉटेलात ५० लिटरपेक्षा अधिक तेलाची गरज पडते, अशा हॉटेलांतील खाद्यपदार्थांची तपासणी आधी करण्यात येते. नियम तोडल्यास कारवाईस सामोरे जावे लागेल. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.

फूटपाथवरील खाद्य न खाल्लेले बरे!फूटपाथवरील हॉटेलात खाद्यतेल अनेक वेळा वापरले जाते. काळ्ळ्याकुट्ट तेलातून पुन्हा तळलेले पदार्थ सेवन केल्यास कर्करोग होऊ शकतो. फूटपाथ- वरील हॉटेलात खाद्यपदार्थाची पाहिजे तेवढी काळजी घेतली जात नाही. अनेकदा पदार्थावर माशा बसतात. शिळे पदार्थही तळून विक्रीला ठेवलेले असतात. रस्त्यांवरून धावणाऱ्या वाहनांची धूळ त्या पदार्थावर बसत असते. तळलेले पदार्थ सेवन केल्यास अनेक आजारांना सामोरे जावे लागते.

टॅग्स :gondiya-acगोंदिया