शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
4
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
5
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
6
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
7
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
8
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
9
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
10
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
11
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
12
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
13
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
14
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
15
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
16
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
17
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
18
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
19
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
20
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर

भजन-कीर्तनातून सरकारला जागविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 9:36 PM

तालुक्यातील जनतेच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्यावतीने ग्राम मुंडीकोटा येथील बाजार चौैकात धरणे आंदोलन करण्यात आले. भगवंताची पूजा- अर्चना व भजन-किर्तनातून करण्यात आलेल्या या जनआक्र ोश आंदोलनातून कार्यकर्त्यांनी सरकारला जागविण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देराष्ट्रवादीचे जनआक्रोश आंदोलन : मुख्यमंत्र्यांना पाठविले मागण्यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : तालुक्यातील जनतेच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्यावतीने ग्राम मुंडीकोटा येथील बाजार चौैकात धरणे आंदोलन करण्यात आले. भगवंताची पूजा- अर्चना व भजन-किर्तनातून करण्यात आलेल्या या जनआक्र ोश आंदोलनातून कार्यकर्त्यांनी सरकारला जागविण्याचा प्रयत्न केला. तसेच सोमवारी (दि.२२) तहसीलदार संजय रामटेके यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले.निवेदनात, कृषी पंपावरील लोडशेडींग बंद करून कृषीपंपांना २४ तास वीज पुरवठा द्यावा, कृषीपंप धारकांना वीज जोडणी देऊन सोलर पंपची अट रद्द करा, धापेवाडा उपसा सिंचन योजनेचे पाणी घाटकुरोडा व चांदोरी बु. पर्यंत द्या, शेतकऱ्यांची सरसकट क र्जमुक्ती करा, तिरोडा तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करा, सालेबर्डी ते चांदोरी बु., देव्हाडा मार्ग दरूस्त करा, घरकुल प्रपत्र-३ मध्ये घरकुल मंजूर करा, वीज दर कमी करा, तुमसर-गोंदिया बस सेवा वाढवा, रासायनिक खतांची किंमत कमी करा, बेरोजगारांना शासनाने नौकरी द्यावी किंवा नवीन कंपन्या सुरू कराव्या, महामार्गांवर शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर जाण्यासाठी वेगळा मार्ग करून द्यावा तसेच घरकुल धारकांना बांधकामाचा १८ हजार ५०० रूपयांचा उर्वरीत हप्ता द्यावा आदि मागण्यांचा समावेश आहे.निवेदन देताना, माजी आमदार राजेंद्र जैन, माजी आमदार दिलीप बंसोड, जिल्हाध्यक्ष पंचम बिसेन, महला जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर, सभापती निता रहांगडाले, सामाजिक न्याय विभाह जिल्हाध्यक्ष मनोज डोंगरे, उपसभापती मनोहर राऊत, जिल्हा परिषद सदस्य कैलास डोंगरे, जिल्हा परिषद सदस्य प्रिती रामटेके, जिल्हा परिषद सदस्य सुनिता मडावी, किशोर पारधी, नत्थु अंबुले, प्रदीप मेश्राम, माया शरणागत, जया धावडे यांच्यासह मोठ्या संख्येत पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस