शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या मजुरांवर तीन अस्वलांचा हल्ला, खैरी बोरटेकरी जंगलातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2021 16:44 IST

बोळदे गावातील चार महिला व दोन पुरुष हे वनविभाग खैरी बोरटेकरी रामघाट जंगल परिसरात पहाटेच्या सुमारास तेंदूपत्ता संकलनासाठी गेले होते. तेव्हा तीन अस्वलांनी रामटेके यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.

बाराभाटी (गोंदीया) :  खैरी बोरटेकरी रामघाट जंगलात तेंदुपत्ता संकलनासाठी गेलेल्या एका तरुणावर तीन अस्वलांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. शैलेश भैय्यालाल रामटेके (वय ३२) असे या तरुणाचे नाव आहे. तो जवळ्या बोळदे येथील राहिवासी असून  या हल्ल्यात जखमी झाला आहे. आज पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

बोळदे गावातील चार महिला व दोन पुरुष हे वनविभाग खैरी बोरटेकरी रामघाट जंगल परिसरात पहाटेच्या सुमारास तेंदूपत्ता संकलनासाठी गेले होते. तेव्हा तीन अस्वलांनी रामटेके यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यांच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली आहे. त्यांच्या खांद्याला अस्वलाच्या नखाचा वार आहे. हा घाव एवढा मोठा आहे, की त्यात अगदी हाताचे बोटही जाईल. तसेच जीव वाचविण्याच्या नादात पळताना मजुराची एका झाडाला धडक बसली. यामुळे त्याच्या पायालाही इजा झाली आहे. संबंधित रुग्णाला ग्रामीण रुग्णालय अर्जुनीमोरगाव याथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

मजूर हे सुशिक्षित बेरोजगार आहेत, हाताला काम नाही, संपूर्ण परिवार हा संकलन करणाऱ्या मजूरावर अवलंबून आहे. कमाई करणारे केवळ मजूरच असल्याने शासनाच्या वनविभागाने पाच लाखाची शासकिय मदत करावी. अशी मागणी परिवाराने केली आहे. यासंदर्भात बोलताना जखमी शैलेश यांचे वडील भैय्यालाल राघो रामटेके, म्हणाले, माझा मुलगा हा परिवार चालविण्यासाठी तेंदुपत्ता संकलन करायला गेला, तर अस्वलाने हल्ला केला. त्यामुळे शासनाने तातडीने मदत करावी. 

तर शैलेश म्हणाले, मी बेरोजगार तरुण असून कुठलेही काम करतो. मी या हल्ल्यात कसाबसा वाचलो. शासनाने पच लाख रुपयांची मदत करावी.

मी स्वतः डिसीएफ कुलराज सिंग यांना फोन केला. त्यांनी फोन स्वीकारला नाही. वनविभाग हे वाऱ्यावरच असल्यासारखे आहे. गंभीर जखमी मजूराला शासनाची मदत तातडीने मिळेल, असा प्रयत्न सुरू आहे. - मनोहर चंद्रिकापुरे, आमदार अर्जुनीमोरगाव विधानसभा.

टॅग्स :Vidarbhaविदर्भforestजंगलforest departmentवनविभाग