शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

दीड हजाराची लाच घेताना सहायक महसूल अधिकारी जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 01:55 IST

संदेश बोरकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, ही कारवाई शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास देवरी तहसील कार्यालयात करण्यात आली. 

देवरी (गोंदिया) : येथील तहसील कार्यालयात कार्यरत असलेल्या एका सहायक महसूल अधिकाऱ्याला दीड हजार रुपयांची लाच स्वीकारताना गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  रंगेहात अटक केली. संदेश बोरकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, ही कारवाई शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास देवरी तहसील कार्यालयात करण्यात आली. 

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील तक्रारदार हे देवरी येथील रहिवासी असून त्यांच्या लेआऊट संदर्भात उच्च न्यायालयात एक रिट याचिका दाखल आहे. या याचिकेचा अहवाल सादर करण्यासाठी आरोपी संदेश बोरकर, सहायक महसूल अधिकारी, याने तक्रारदाराकडे दीड हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याप्रकरणी गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार नोंदवली. प्राप्त तक्रारीची दखल घेत एसीबीच्या पथकाने शुक्रवारी तहसील कार्यालय परिसरात सापळा रचला.रात्री ८ वाजता तहसीलमध्ये कारवाईशुक्रवारी दिवसभर कार्यालयाचे कामकाज आटोपल्यानंतर रात्री ८ वाजेच्या सुमारास जेव्हा तक्रारदाराने ठरलेली लाचेची रक्कम संदेश बोरकर याला दिली, त्याच वेळी दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. आरोपीकडून लाचेची रक्कम जप्त करण्यात आली असून, त्याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.महसूल विभागात खळबळतहसील कार्यालयासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी आणि तेही रात्रीच्या वेळी ही कारवाई झाल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गोंदियाच्या चमू ने केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Assistant Revenue Officer caught red-handed accepting bribe of ₹1,500

Web Summary : In Deori, Gondia, an Assistant Revenue Officer was arrested by the Anti-Corruption Bureau for accepting a ₹1,500 bribe. He demanded the money to submit a report related to a layout petition. The officer was caught red-handed at the Tehsil office after a complaint was filed.
टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारPoliceपोलिस