शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीशी वाद; रागाच्या भरात शिक्षकाची रेल्वेखाली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 12:56 IST

आमगाव रेल्वेस्थानकावरील प्रकार : मृत शिक्षक मध्य प्रदेशच्या विदिशा जिल्ह्यातील

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : रागाच्या भरात घेतलेला निर्णय जिवावर बेतला. रविवारी (दि. १ जून) सायंकाळी आमगाव रेल्वेस्थानकावर पत्नीशी झालेल्या वादानंतर एका शिक्षकाने छत्तीसगड एक्स्प्रेससमोर उडी घेत आत्महत्या केली. या घटनेने रेल्वेस्थानकावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. तुलसीदास पराते (वय ३५, रा. विदिशा, मध्य प्रदेश) असे मृत शिक्षकाचे नाव आहे.

विदिशा येथे शिक्षक म्हणून कार्यरत तुलसीदास पराते हे पत्नी आणि मुलीसह आमगावला लागून असलेल्या मध्य प्रदेश राज्यातील कारंजा येथे आयोजित एका कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. कार्यक्रम आटोपून ते रविवारी (दि. १) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घरी परतण्यासाठी पत्नी आणि मुलीसह आमगाव स्टेशनवर पोहोचले. ते गावाला जाण्यासाठी छत्तीसगड एक्स्प्रेसची वाट पाहत होते. दरम्यान, कुठल्या तरी गोष्टीवरून पती पत्नीमध्ये भांडण सुरू झाले. हा वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात येऊन तुलसीदास यांनी अचानक प्लॅटफॉर्मवर आलेल्या छत्तीसगड एक्स्प्रेसच्या इंजिनसमोरच उडी मारून आत्महत्या केली. घटनेनंतर पत्नी आणि मुलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून लोकांची गर्दी जमली. यामुळे आमगाव रेल्वेस्थानकावर काही वेळ गोंधळ उडाला होता. पतीने उचललेल्या पावलामुळे पत्नी व मुलीची अवस्था केविलवाणी झाली होती. रेल्वेस्थानकावरील या प्रसंगाने उपस्थित प्रवासी आणि रेल्वे विभागाचे कर्मचारीसुद्धा हळहळले.

रेल्वे पोलिसांनी केली घटनेची नोंदया घटनेची माहिती मिळताच आमगाव रेल्वे पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांच्या दिलेल्या माहितीनुसार, ही ट्रेन बिलासपूरहून गोंदिया मार्गे अमृतसरला जात होती. या कुटुंबाला या ट्रेनने प्रवास करायचा होता; पण नशिबात काहीतरी वेगळेच लिहिले होते. घटनास्थळी पंचनाम्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी आमगाव रुग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून, तपास सुरू आहे. 

टॅग्स :gondiya-acगोंदियाCrime Newsगुन्हेगारी