लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र सरकारने रेल्वेसाठी अनेक मोठ्या प्रकल्पांची घोषणा शुक्रवारी (दि. ४) केली आहे. या रेल्वे प्रकल्पांना मंत्रिमंडळानेही मान्यता दिली आहे. यात गोंदिया-बल्हारशाह रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी ४८१९ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासूनचा प्रश्न मार्गी लागला आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी गोंदिया-बल्लारशाह रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण प्रकल्पास मंजुरी दिल्याची घोषणा केली. या प्रकल्पाला तत्कालीन खा. सुनील मेंढे यांच्या कार्यकाळात डीपीआरला मंजुरी देण्यात आली होती. यासाठी ४,८१९ कोटी रुपये खर्च येणार आहे. या लोहमार्गाची लांबी २४० किमी आहे. नुकतेच वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे पोलाद नगरी असलेला गडचिरोली जिल्हा मोठ्या प्रमाणावर रेल्वेच्या नकाशावर आल्यामुळे खनिज पोलाद आणि प्रक्रिया केलेले लोखंडी मालवाहतूक सोइची होईल. भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर या जिल्ह्यातील भरपूर
चारही जिल्ह्यांसाठी ठरणार वरदानउत्तर भारत व पूर्व भारत दक्षिण भारताशी जोडणारा हा रेल्वे मार्ग खूप सोयीचा झाल्यामुळे वरील क्षेत्रातील प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणावर सोयीची झाली आहे. या चारही जिल्ह्यामधील खनिजे कोळसा मँगनीज व पोलादाची माल वाहतूकदेखील मोठ्या प्रमाणावर गतिमान होणार आहे. त्यामुळे हे दुहेरीकरण या चारही जिल्ह्यांच्या विकासाला वरदान ठरेल.
ही आहेत या प्रकल्पाची वैशिष्ट्ये
- लाभार्थी जिल्हे : गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर.
- एकूण रेल्वे स्थानके : २१
- पूल : ४८ मोठे पूल, ३४९ छोटे पूल, १४ आरओबी, १८४ आरयूबी, ५ रेल्वे उड्डाणपूल
- रेल्वे मार्गाची लांबी : २७८ किमी मार्गाची लांबी; ट्रॅकची लांबी ६१५ किमी
- डिझेलची बचत : दरवर्षी २२ कोटी लिटर
- लॉजिस्टिक्स खर्चात बचत: दरवर्षी २५२० कोटी