शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

हेराफेरी टाळण्यासाठी प्रत्येक केंद्रावर जामर लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 10:10 PM

कर्नाटक विधानसभेचा हुबळी मतदारक्षेत्रात ईव्हीएम मशिनमध्ये आकड्यांची हेराफेरी करण्यात आली. त्यामुळे भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत या प्रकाराची पुनर्रावृत्ती होवू नये, यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर जामर लावण्याची गरज असल्याचे माजी खासदार नाना पटोले यांनी येथे सांगितले.

ठळक मुद्देनाना पटोले : पारदर्शक पार पडावी प्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कर्नाटक विधानसभेचा हुबळी मतदारक्षेत्रात ईव्हीएम मशिनमध्ये आकड्यांची हेराफेरी करण्यात आली. त्यामुळे भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत या प्रकाराची पुनर्रावृत्ती होवू नये, यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर जामर लावण्याची गरज असल्याचे माजी खासदार नाना पटोले यांनी येथे सांगितले.कर्नाटक निवडणूक झाल्यानंतर आता भाजपमध्ये सत्तेत सहयोगी असलेला शिवसेनेचे पक्षनेते सुध्दा ईव्हीएम निवडणूक मशिनवर शंका घेत आहे. आम्ही सुध्दा निवडणूक अधिकारी यांना लोकशाही पध्दतीने व निष्पक्षपणे निवडणूक व्हावी. तसेच गुजरातमधील सुरत येथून ईव्हीएम मशिनच्या मागणीबाबत विरोध केला. त्यासंबंधीचे निवेदन खासदार प्रफुल्ल पटेल व मी सुध्दा निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहे. भाजपच्या शासनामुळे लोकशाही धोक्यात येण्याची शक्यता असून सर्वच राजकीय पक्षांनी ईव्हीएम मशिनला विरोध केला आहे. आता तरी लोकांनी जागृत होण्याची गरज असल्याचे पटोले म्हणाले.केंद्र व राज्यात भाजपाचे सरकार आहे. पण रिमोट कंट्रोलमुळे कुणाला आपल्या समस्या मांडण्याचा अधिकार नाही. त्यामुळेच मी स्वत: खासदार पदाचा राजीनामा दिला आहे. यापूर्वीही आपल्या समस्या मांडण्याचा प्रयत्न ज्या नेत्यांनी केला त्याचांही एकनाथ खडसे आणि गोपिनाथ मुंडे यांच्या सारखाच गेम झालेला आहे. कृषी मोटारपंपांना चोविस तास वीज पुरविण्याचे आश्वासन सत्ताधाºयांनी दिले होते. परंतू ते आश्वासन सुध्दा खोटे ठरले आहे. प्रधानमंत्री यांच्यासारखे मोठे नेते संयम सोडून बोलत असतात.कर्नाटक विधानसभेच्या निवडणूकीत ते दिसून आले. भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री लोकसभा निवडणुकीत आचारसंहितेचा भंग करतात. त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे, पण तसे होताना दिसत नाही. ही लोकशाहीची परंपरा नाही. मी लोकशाही मानणारा व्यक्ती असून शेतकरी व बेरोजगार लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकित्रतपणे लोकसभेची निवडणूक लढवित आहेत.तिन वेळा आमदार राहिलेले मधुकर कुकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मधुकर कुकडे यांना लोकांच्या समस्येची जाणीव आहे. त्यामुळे भाजप उमेदवारांपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस उमेदवार वरचढ असल्याचा दावा पटोले यांनी केला. भंडारा गोंदिया लोकसभेची पोटनिवडणूक परिवर्तनाची नांदी ठरणार आहे.देशातील मोठ्या नेत्यांचे भंडारा, गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीकडे लक्ष लागले आहे. अन्याय करणारी व्यवस्था हाणून पाडण्यासाठी शेतकरी व बेरोजगार लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी खोटे आश्वासन देवून लोकांना भुरळ पाडणाºया भाजपला धडा शिकविण्याची हीच वेळ असल्याचे पटोले यांनी सांगितले.

टॅग्स :Electionनिवडणूक