शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
4
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
5
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
6
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
7
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
8
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
9
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
10
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
11
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
12
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
13
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
14
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
15
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
16
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
17
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास
18
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
19
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
20
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे

गोंदियातील तब्बल २७ हजार लाडक्या बहिणींचे अर्ज झाले रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 16:12 IST

अर्जाची छाननी सुरू : ३ लाख १४ हजार लाडक्या बहिणी ठरल्या पात्र

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यातील ३ लाख ६४ हजार २४५ लाडक्या बहिणींनी अर्ज केले होते. या अर्जाची पडताळणी करण्याचे काम सध्या सुरू असून, यात २६ हजार ९२७ लाडक्या बहिणींच्या अर्जात त्रुट्या व ते निकषात बसत नसल्याने रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे आता ३ लाख १४ हजार १७ लाडक्या बहिणींच्या खात्यावर ७ मार्च रोजी दोन हप्त्यांचे पैसे जमा होण्याची शक्यता आहे.

महिला दिनाचे औचित्य साधून राज्य सरकारने लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर जानेवारी आणि फेब्रुवारी, अशा दोन महिन्यांचे तीन हजार रुपयांचे अनुदान ७ मार्च रोजी जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचीच सध्या प्रक्रिया सुरू आहे. गोंदिया जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे एकूण ३ लाख ६४ हजार २४५ लाभार्थी होते. मात्र, सुरुवातीला या योजनेसाठी पात्र नसलेल्या अनेक लाभार्थ्यांनी अर्ज करून या योजनेचा लाभ घेतला होता. ही बाब शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर शासनाने अर्जाची पडताळणी करण्याचे निर्देश महिला व बाल विकास विभागाला दिले आहे. त्यात चारचाकी असणारे लाभार्थी, नोकरीवर असलेल्या, आयकर भरणाऱ्या आणि लग्न होऊन दुसऱ्या राज्यात गेलेल्या लाभार्थ्यांचे अर्ज रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत. तर काही लाभार्थी कारवाईच्या भीतीने अनुदान नको, म्हणून या विभागाकडे अर्ज करीत आहे. तर काही अर्जामध्ये पडताळणींमध्ये त्रुट्या आढळल्या. त्यामुळे असे एकूण २६ हजार ९२७ अर्ज आतापर्यंत रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील ३ लाख १४ हजार १७ लाडक्या बहिणींच्या खात्यावर जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांचे अनुदान जमा होण्याची शक्यता आहे.

७ फेब्रुवारीला होणार अनुदानमहिला दिनाच्या पूर्वसंध्येला जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांचे एकूण ३ हजार रुपयांचे अनुदान लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा करून त्यांना महिला दिनाची भेट देण्याचे नियोजन शासनाने केले आहे. त्यासाठी सध्या प्रक्रिया सुरू आहे.

३ लाख ६४ हजार अर्जाची पडताळणीमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील ३ लाख ६४ हजार २४५ महिलांनी अर्ज केले होते. आता शासनाने ठरवून दिलेल्या निकषाच्या आधारावर या सर्व अर्जाची पडताळणी करण्याचे काम महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून सुरू आहे. त्यात बरेच अर्ज निकषात न बसणारे असल्याची माहिती पुढे आली आहे.

जिल्ह्यातील तालुकानिहाय पात्र व अपात्र लाभार्थीतालुका        पात्र लाभार्थी          अपात्र लाभार्थीगोरेगाव           ३३,५१७                   २,७१७गोंदिया            ७९,००१                   ७,०२४अर्जुनी मोर.      ३८,०४३                  २,५८९सडक अ.        ३०,७१७                   २,५५६देवरी              २९,८७९                  २,७४९आमगाव         ३४,७८७                  २,८७५तिरोडा            ४२,९११                   ४,७२०सालेकसा        २५,१६२                   १,६९७एकूण            ३,१४,०१७                २६,९२७

२० लाडक्या बहिणींनी सोडला लाभलाडकी बहीण योजनेंतर्गत लाभार्थी महिलांपैकी नोकरीवर असलेल्या व अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या २० लाडक्या बहिणींनी आतापर्यंत योजनेचा लाभ सोडण्यासाठी महिला व बाल विकास विभागाकडे अर्ज केले आहे.

५० लाडक्या बहिणींकडे चारचाकीमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी सुरू आहे. त्यात ५० लाडक्या बहिणींकडे चारचाकी वाहने असल्याचे पुढे आले. त्यामुळे त्यांचे अर्ज रद्द करण्यात आले आहे, तर काही अर्जाची पुन्हा पडताळणी केली जात असल्याची माहिती संबंधित विभागाने दिली.

टॅग्स :gondiya-acगोंदियाladki bahin yojanaलाडकी बहीण योजनाgovernment schemeसरकारी योजना