लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील पूर्ण कोरोना बाधित बुधवारीपर्यंत (दि.१०) कोरोनामुक्त झाल्याने जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त झाला होता. त्यामुळे जिल्हावासीयांना सुध्दा दिलासा मिळाला होता. मात्र शुक्रवारी (दि.१२) दुबईहून तिरोडा तालुक्यात आलेला व्यक्ती कोरोना बाधित आढळल्याने कोरोनाने जिल्ह्यात पुन्हा शिरकाव केला. तर याच कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीच्या स्वॅब नमुन्याचा अहवाल शनिवारी (दि.१३) कोरोना पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात एकूण दोन कोरोना अॅक्टीव्ह रुग्ण आहे. तर आत्तापर्यंतच्या एकूण कोरोना बाधित रुग्णांचा आकडा ७१ वर पोहचला आहे.गोंदिया जिल्हा तब्बल ३९ दिवस कोरोनामुक्त असल्याने ग्रीन झोनमध्ये होता. मात्र बाहेर जिल्हा आणि राज्यातून आलेल्या नागरिकांमुळे जिल्ह्यात १९ मे रोजी पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर २१ दिवसांच्या कालावधीत तब्बल ६९ कोरोना बाधिताची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा उदे्रक झाला होता. मात्र जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्याने १० जून रोजी जिल्ह्यातील सर्व कोरोना बाधित कोरोनामुक्त झाले होते. तर दहा दिवस नवीन कोरोना बाधित रुग्णाची नोंद झाली नव्हती. त्यामुळे जिल्हावासीयांना दिलासा मिळाला होता. मात्र दुबईहून तिरोडा तालुक्यात आलेल्या एका व्यक्तीच्या स्वॅब नमुन्याचा अहवाल शुक्रवारी कोरोना पॉझिटिव्ह आला. तर शनिवारी याच कोरोना बाधिताच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचा अहवाल सुध्दा कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना अॅक्टीव्ह कोरोना बाधित रुग्णांची संख्या दोन वर पोहचली. तर जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण ७१ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे गोंदिया जिल्ह्यात आत्तापर्यंत जेवढे कोरोना बाधित रुग्ण आढळले हे सर्व रुग्ण रेडझोन मधून आणि बाहेरील राज्यातून आले आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्हावासीयांना सुध्दा अधिक सर्तक राहण्याची गरज असून जिल्हा प्रशासनाला सुध्दा यावर बारीक नजर ठेवावी लागणार आहे.आतापर्यंत जिल्ह्यातील ११४० स्वॅब नमुने निगेटिव्हकोरोना संसर्गाच्या अनुषंगाने लक्षणे दिसताच अशा व्यक्तींचे स्वॅब नमुने घेवून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जातात. आतापर्यंत एकूण १२११ व्यक्तींचे स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ११४० नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. तर ७१ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. २७ नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून मेडिकल आणि जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त व्हायचा आहे.
जिल्ह्यात पुन्हा एका कोरोना बाधिताची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 05:00 IST
गोंदिया जिल्हा तब्बल ३९ दिवस कोरोनामुक्त असल्याने ग्रीन झोनमध्ये होता. मात्र बाहेर जिल्हा आणि राज्यातून आलेल्या नागरिकांमुळे जिल्ह्यात १९ मे रोजी पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर २१ दिवसांच्या कालावधीत तब्बल ६९ कोरोना बाधिताची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा उदे्रक झाला होता.
जिल्ह्यात पुन्हा एका कोरोना बाधिताची नोंद
ठळक मुद्देएकूण कोरोना बाधितांचा आकडा ७१ वर । जिल्ह्यात दोन कोरोना अॅक्टीव्ह रुग्ण