शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

पशुपालन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 19:57 IST

पशुपालन व्यवसाय हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकऱ्यांनी शेतीसोबतच पशुपालनाचा जोडधंदा करून स्वत:च्या आर्थिक परिस्थितीसोबतच ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करावी, असे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी केले.

ठळक मुद्देमहादेव जानकर : लाळ खुरकूत रोग प्रतिबंधक लसीकरण अभियान

आॅनलाईन लोकमतदेवरी : पशुपालन व्यवसाय हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकऱ्यांनी शेतीसोबतच पशुपालनाचा जोडधंदा करून स्वत:च्या आर्थिक परिस्थितीसोबतच ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करावी, असे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी केले.पशुसंवर्धन विभागाच्या वतीने केंद्र पुरस्कृत लाळ खुरकूत रोग प्रतिबंधक लसीकरण अभियानांतर्गत देवरी तालुक्यातील भर्रेगाव ग्रामपंचायत कार्यालयात शनिवारी (दि.२४) घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी सरपंच विद्या खोटेले होत्या. या वेळी पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉ. संजय गायगवळी, जि.प. पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. शहारे, जि.प. पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजेश वासनिक, पशुधन विकास अधिकारी डॉ. विजय कोळेकर, तहसीलदार विजय बोरूडे, गटविकास अधिकारी हिरूळकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.जानकर म्हणाले, राज्य व केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागांतर्गत अनेक योजना आहेत. त्या योजनांचा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकºयांनी लाभ घ्यावा. गोंदिया तलावांचा जिल्हा आहे. त्यासाठी प्रत्येक शेतकºयाने जोडधंदा म्हणून माशांची शेती करावी. ग्रामीण भागातील नागरिकांनी कुक्कुटपालन व्यवसाय करावा. शेतकºयाचा मुलगा उद्योगपती कसा बनेल, यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. मुला-मुलींनी शिक्षण घेतले पाहिजे. शिक्षणाशिवाय माणसाची प्रगती होत नाही. पशुसंवर्धन विभागातील रिक्त असलेली पदे लवकरात लवकर कशा पध्दतीने भरता येतील, यासाठी राज्य शासन सकारात्मक आहे. लाळ खुरकूत हा गाई-म्हशींमध्ये विषाणूमुळे होणारा सांसर्गिक रोग आहे. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होते. लसीकरणामुळे पशुधनाचा लाळ खुरकूत या सांसर्गिक रोगापासून बचाव होतो. त्यामुळे उत्पादनाचे सातत्य टिकून राहते व रोगमुक्त पशुजन्य उत्पादनांची निर्यात सुलभ होते. सर्व शेतकºयांनी एफएमडीसीपी अंतर्गत लाळ खुरकूत रोग प्रतिबंधक लसीकरण अभियानाचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.डॉ. शहारे म्हणाले, जिल्ह्यातील संकलित दुधाकरिता मार्केटिंगची आवश्यकता आहे. या लसीकरण अभियानाचा सर्व गोपालकांनी जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले.प्रास्ताविकातून डॉ. वासनिक म्हणाले, जनावरांचे लाळ खुरकूत रोगापासून संरक्षण करण्यासाठी त्यांचे वर्षातून दोन वेळा लसीकरण करावे. हा रोग संसर्गजन्य असल्यामुळे गावातील सर्व जनावरांचे लसीकरण एकाच दिवशी केल्यास त्याचा जास्त फायदा होतो. लसीकरण शक्यतो सकाळी किंवा सायंकाळी उशीरा म्हणजेच थंड वातावरणात करावे. लाळ खुरकूत रोगप्रतिबंधक लसमात्रा पशुवैद्यकीय दवाखान्यात उपलब्ध आहेत. त्यासाठी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाला पशुधन विकास अधिकारी डॉ. रोहिणी साळवे, डॉ. सायली तगारे, सहायक पशुधन विकास अधिकारी डॉ. सुनील आकांत, डॉ. वानखेडे, डॉ. चौधरी, डॉ. येडेवार, पशुधन पर्यवेक्षक डॉ. पदम, ग्रामपंचायत सदस्य गीता पंधरे, ग्रामसेवक एस.एस. सिरसाम, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पुरूषोत्तम रहिले व गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. संचालन डॉ. येडेकर यांनी केले. आभार पशुधन विकास अधिकारी डॉ. कोळेकर यांनी मानले.