शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

अंगणवाडी सेविकांचा ‘रास्ता रोको’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 9:18 PM

अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या मानधनात वाढ करा, यासह विविध मागण्यांना घेऊन महाराष्टÑ राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्त्वात अंगणवाडी सेविकांनी ....

ठळक मुद्देसरकारच्या विरोधात नारेबाजी : अटक देत नोंदविला निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या मानधनात वाढ करा, यासह विविध मागण्यांना घेऊन महाराष्टÑ राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्त्वात अंगणवाडी सेविकांनी गुरूवारी (दि.५) दुपारी १२ वाजता गोंदिया-बालाघाट मार्गावर तासभर रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी त्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ११ सप्टेबर पासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. मात्र अद्यापही शासनाने त्यांच्या मागण्यांची दखल न घेतल्याने विविध अंगणवाडी संघटनांनी ५ आॅक्टोबरला जेलभरो आंदोलनाचा इशारा दिला होता.महाराष्टÑ राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती, अंगणवाडी कर्मचारी महासंघ गोंदिया जिल्हा शाखेच्या नेतृत्त्वात गुरूवारी जिल्हाभरातून आलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी जयस्तंभ चौक येथून उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढला.मोर्चात सहभागी अंगणवाडी सेविकांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, आणि फडणवीस सरकार विरोधात जोरदार नारेबाजी केली. अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांची दखल न घेणाºया सरकारचा धिक्कार असो, आमच्या मागण्या हक्काच्या नाही कुणाच्या बाप्पाच्या, असे नारे देत शासनाचा निषेध नोंदविला. गोंदिया-बालाघाट मार्गावरील नेहरु चौकात तासभर रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यानंतर अंगणवाडी सेविकांनी शासनाचा निषेध नोंदवित स्वत:हून पोलिसांना अटक दिली.अटक देण्यापूर्वी शेकडो अंगणवाडी सेविकांच्या उपस्थितीत उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.आंदोलनात शेकडो अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या. पोलिसांनी अंगणवाडी सेविकांना ताब्यात घेऊन काहीवेळानंतर त्यांची सुटका केली. मोर्चादरम्यान कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. या आंदोलनाचे नेतृत्त्व हौसलाल रहांगडाले, शंकुतला फटींग, आम्रकला डोंगरे, जिवनकला वैद्य, बिना गौतम, ब्रिजुला तिडके, सुनीता मलगामे, विजया डोंगरे, प्रेमलता तेलसे, लिलावती रहांगडाले, सविता मोवारे, शंकुतला गोडाने, कल्पना पटले, उषा लांजेवार, कविता सहारे, पदमेश्वरी बिसेन, सुनीता रहमतकर, शारदा खोब्रागडे, मंगला शहारे, कांता डोंगरवार यांनी केले.पोलिसांची धावपळअंगणवाडी सेविकांनी गुरूवारी गोंदिया बालाघाट मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. यात जिल्ह्यातील शेकडो अंगणवाडी सेविका सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या त्यामुळे पोलिसांची थोडी धावपळ उडाल्याचे चित्र होते.