बाराभाटी : गुरुवारच्या रात्री भूकंपाचा धक्का अनुभवला आणि ग्रामीण जनतेची झोपच उडाली. रात्रभर भीतीयुक्त वातावरणात लोक जागे होते. अनेक ठिकाणी ग्रामपंचायतची निवडणूक असल्याने आधीच लोक घोळक्याघोळक्याने रात्री गप्पांमध्ये रंगत आहेत. त्यातच गुरूवारी रात्री भूकंपाचे धक्के बसल्याने खेड्यापाड्यातील जनता अस्वस्थ झाली होती. भीतीमुळे नागरिक परिवारासह घराबाहेर पडले. पुन्हा भुकंप येण्याच्या अफवेने त्याच्या भीतीत आणखीच भर घातली. त्यामुळे आपण घरात असताना भूकंप आला आणि घर पडून त्याखाली दबलो तर काय, अशी भिती बाळगून नागरिकांनी घराबाहेर खाट टाकून त्यावर गप्पा मारत रात्र काढली. (वार्ताहर)
अन् त्यांनी रात्र जागून काढली
By admin | Updated: July 25, 2015 01:34 IST