लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील शासकीय रुग्णवाहिका (क्रमांक-१०२) या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चालविल्या जात आहेत. त्या रुग्णवाहिकांच्या कंत्राटी वाहन चालकांना ११ महिन्यांच्या करारावर आदेश देण्यात आले होते. परंतु जिल्हा परिषदेने काही काळानंतर म्हणजे दोन वर्षांपूर्वी त्यांना रोजंदारीवर दाखविले. त्यामुळे मागील २५ दिवसांपासून हे रूग्णवाहिका चालक उपोषणावर बसले होते. परंतु देशात कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे २४ तास सेवा देण्यासाठी रूग्णवाहिका चालक कामावर परतण्यासाठी आंदोलन मागे घेतले आहे.२००५ पासून आजपर्यंत अतिदुर्गम व अतिसंवेदनशिल भागात गरोदर माता आणि ० ते १ वर्षातील बालकांना सुरळीतपणे रुग्णवाहिकेने सेवा दिली. पाऊस, ऊन्ह, वादळ हे न बघता रात्रंदिवस २४ तास सेवेत तत्पर राहतात. त्या वाहन चालकांना राष्ट्रीय आरोग्य अभियानात ११ महिन्यांच्या कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यात आली होती. परंतु त्या कंत्राटी वाहन चालकांना जिल्हा परिषदेने २ वर्षापूर्वी भोपाळ येथील कंपनीचे कर्मचारी दाखविले. त्या वाहन चालकांना राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे कंत्राट द्यावे असे स्थायी समितीच्या सभेत ठरविल्यावर ते पूर्वी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानचेच वाहन चालक होते असे लक्षात आले.जिल्हा परिषदेतील वरिष्ठ पदाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी कोणतेच पत्र न पाहता त्या ६७ वाहन चालकांना ठेकेदारांच्या हातात देवून टाकले. कंत्राटी तत्वावर असलेल्या वाहन चालकांना रोजंदारीवर करून टाकले. तो आदेश रोजंदारी वाहन चालकांकरिता होता. परंतु कंत्राटी तत्वावर असलेल्या या वाहन चालकांना तो आदेश चुकीच्या पद्धतीने लावल्याचा आरोप या वाहन चालकांचा आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत वाहन चालक होते तसा पुरावा देखील त्यांच्याकडे आहे.जिल्हा परिषदमार्फत आदेशान्वये आम्हाला ठेकेदारी मुक्त करुन राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत आदेश देवून त्यात समाविष्ट करण्याची मागणी वाहन चालकांनी केली होती. परंतु त्यांची मागणी पूर्ण न झाल्यामुळे मागील २५ दिवसांपासून ते उपोषणावर बसले होते. परंतु कोरोनाचा संसर्ग पाहता हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. शुक्रवारी (दि.२०) रोजी आ. विजय रहांगडाले यांनी त्यांच्या आंदोलन मंडपाला भेट दिली होती.त्याचवेळी हे आंदोलन मागे घेण्यात आले.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी वाहन चालकांचे आंदोलन मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 06:00 IST
२००५ पासून आजपर्यंत अतिदुर्गम व अतिसंवेदनशिल भागात गरोदर माता आणि ० ते १ वर्षातील बालकांना सुरळीतपणे रुग्णवाहिकेने सेवा दिली. पाऊस, ऊन्ह, वादळ हे न बघता रात्रंदिवस २४ तास सेवेत तत्पर राहतात. त्या वाहन चालकांना राष्ट्रीय आरोग्य अभियानात ११ महिन्यांच्या कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यात आली होती.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी वाहन चालकांचे आंदोलन मागे
ठळक मुद्दे२५ दिवसानंतर घेतला निर्णय : ६७ वाहन चालक सेवेवर परतणार