शहरं
Join us  
Trending Stories
1
निसर्गाचा कोप! अफगाणिस्तानात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार; १७ जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील ५ जण गाडले गेले
2
ऑनलाईन खरेदी महागात पडली! शूज ऑर्डर केला, होल्डवर पडल्याचा फोन आला अन् ५५ हजार रुपये झटक्यात उडाले
3
पहिल्यांदाच जगासमोर आली किम जोंग उन यांची मुलगी; किम जु आए उत्तर कोरियाची पुढची हुकूमशहा बनणार?
4
१ फेब्रुवारीपासून सिगारेट महागणार; ब्रँड अन् लांबीवरून ठरणार किंमत
5
कर्नाटकात बॅनर वादातून रक्तरंजित खेळ! दोन आमदारांच्या समर्थकांमध्ये हाणामारी; गोळीबारात एकाचा मृत्यू
6
अखेरच्या क्षणी महिंद्राची टाटाला ओव्हरटेक! तिसऱ्या नंबरवर फेकली गेली; किया, एमजीची चांगली कामगिरी...
7
माओवादी कमांडर बारसे देवा पोलिसांना शरण! ‎​हिडमाच्या खात्म्यानंतर नक्षली बॅकफूटवर: तेलंगणात केले आत्मसमर्पण
8
२०२६चा पहिला गजकेसरी राजयोग: ८ राशींना सुबत्ता, पद-पैसा वाढ; लक्षणीय यश, ३ दिवस वरदान काळ!
9
फास्टॅग वापरकर्त्यांना नवीन वर्षात मोठे गिफ्ट! १ फेब्रुवारीपासून 'KYV' ची कटकट संपणार; NHAI चा मोठा निर्णय
10
२०२६ची पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी: ३ गोष्टी करा, बाप्पा संकट दूर करेल; सगळे मनासारखे होईल!
11
एक चूक आणि बँक अकाउंट रिकामं! सायबर फसवणूक करणाऱ्यांच्या ५ पद्धती जाणून घ्या अन् काळजी घ्या
12
वाढदिवसाच्या दिवशीच शिवसेना नेत्याच्या लेकीचा अंत; बाथरूममधील 'त्या' एका चुकीने घात केला
13
अनेक बचत खात्यांचा सापळा; जास्त बचत खात्यांमुळे नेमका फटका कसा बसतो?
14
नैनीतालमध्ये गर्लफ्रेंडसोबत फिरत होता नवरा, अचानक समोर आली बायको; मग जे झालं...
15
१ फेब्रुवारी २०२६ पासून सिगरेट महागणार, कोणत्या Cigarette ची किती वाढणार किंमत?
16
Indian Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,४२० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
17
एअर इंडियाच्या पायलटचा कॅनडात 'हायव्होल्टेज' ड्रामा; उड्डाणापूर्वीच झिंगला, मग जे घडलं ते धक्कादायक!
18
कर महसुलात महाराष्ट्रच ‘किंग’; देशाच्या एकूण तिजोरीत २२% वाटा एकट्या महाराष्ट्राचा
19
‘फॅमिली फर्स्ट’! शिंदेसेनेच्या मुंबईतील उमेदवारांत नेत्यांच्या नातेवाईकांचाच भरणा; माजी आमदार चक्क नगरसेवक पदासाठी रिंगणात 
20
कर्जाच्या जाळ्यात अडकली तरुणाई, विना गॅरंटी कर्जाची थकबाकी वाढतेय; बँकांवर ताण - आरबीआय
Daily Top 2Weekly Top 5

बीडी कामगारांना रोजगार व बिडी विक्रीची परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 05:00 IST

कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यासाठी केंद्र सरकारने ‘लॉकडाऊन’ पुकारले आहे. ‘लॉकडाऊन’ चा तिसरा टप्पा सुरू असून देशभर रेड, ऑरेंज व ग्रीन झोन जाहीर करण्यात आले आहे. ऑरेज व ग्रीन झोनमध्ये उद्योगधंदे व आस्थापना सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र बिडी कारखाने सुरू झाले नसल्याने संघटनेने बिडी मालकांकडे कारखाने सुरू करून बिडी कामगारांना काम देण्यास सांगितले होते.

ठळक मुद्देफेडरेशनची मागणी : १८ मे रोजी लाक्षणिक उपोषण, मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ‘लॉकडाऊन’मध्ये बिडी कामगारांचा रोजगार बुडाला असून त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. याची दखल घेत केंद्र व राज्य सरकारने तातडीने बिडी कामगारांना रोजगार मिळवून द्यावा व बिडी विक्री करण्यास परवानगी देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य बिडी कामगार फेडरेशनच्यावतीने करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्रातील व गोंदिया-भंडारा बिडी कामगार आपल्या कुटुंबियांसह सोमवारी (दि.१८) घरीच लाक्षणिक उपोषण करणार आहेत. यानंतरही हा प्रश्न न सुटल्यास बिडी कामगार रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती फेडरेशनचे राज्याध्यक्ष कारभारी उगले व सचिव शंकर न्यालपेलली यांनी दिली.कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यासाठी केंद्र सरकारने ‘लॉकडाऊन’ पुकारले आहे. ‘लॉकडाऊन’ चा तिसरा टप्पा सुरू असून देशभर रेड, ऑरेंज व ग्रीन झोन जाहीर करण्यात आले आहे. ऑरेज व ग्रीन झोनमध्ये उद्योगधंदे व आस्थापना सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र बिडी कारखाने सुरू झाले नसल्याने संघटनेने बिडी मालकांकडे कारखाने सुरू करून बिडी कामगारांना काम देण्यास सांगितले होते. मात्र बिडी मालकांनी ‘लॉकडाऊन’ काळात केंद्र व राज्य सरकारने तंबाखू आणि तंबाखूजन्य बिडी विक्री करण्यास मनाई केली आहे. सरकारने सदरील मनाई मागे घेतल्याशिवाय कारखाने सुरू करून बिडी कामगारांना काम देऊ शकत नसल्याची भूमिका जाहीर केली. यामुळे बिडी कामगारांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. बिडी कामगार मागील ४५ दिवसांपासून कामाअभावी बेकार आहेत.त्यांना केंद्र व राज्य सरकारकडून बिडी कामगारांना कोणतीही आर्थिक मदत देण्यात आलेली नाही. तसेच बिडी मालकाकडूनही मदत मिळालेली नाही. बिडी कामगार सामाजिक व आर्थिक दुर्बल घटकांत असून ९९ टक्के बिडी कामगार महिला आहेत. अशा परिस्थितीत कामगारांच्या कुटुंबांची उपासमार होत आहे. केंद्र व राज्य सरकारने बिडी कामगारांच्या आर्थिक व सामाजिक परिस्थितीचा विचार करून त्यांना त्वरीत आर्थिक मदत करण्याची मागणी केली जात आहे. तसेच बिडी मालकांनी बिडी कारखाने त्वरीत सुरू करून बिडी कामगारांना काम देण्यात द्यावे, केंद्र सरकारने तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास त्वरीत परवानगी द्यावी, मालकांनी बिडी कामगारांना मार्च, एप्रिल व मे या ३ महिन्यांकरिता ६ हजार रूपये अनामत रक्कम द्यावी, तेलंगाणा सरकारच्या धर्तीवर बिडी कामगारांना जीवन भत्ता म्हणून दरमहा २ हजार रूपये राज्य सरकारने द्यावे, केंद्र सरकारने केंद्रीय कामगार कल्याण निधीमधून प्रत्येक बिडी कामगारास सात हजार पाचशे रूपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांसह, मुख्यमंत्री, पालकमंत्री, कामगार मंत्री व कामगार आयुक्तांना पाठविण्यात आले आहे. आपल्या मागणीसाठी बिडी कामगारांनी १८ मे रोजी घरीच राहून लाक्षणिक उपोषण करावे असे रामचंद्र पाटील, अनिल तुमसरे, विकास कुर्वे, रामकिशोर कावळे, मनोज वलथरे, देवेंद्र गणविर यांनी कळविले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या