शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
3
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
4
Axar Patel: विराट कोहली, ख्रिस गेलनंतर फक्त अक्षर पटेलच करू शकला 'अशी' कामगिरी!
5
Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?
6
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
7
‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला  मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
8
महामार्गांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा, त्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून...; सर्वोच्च न्यायालयाचे तीन आदेश
9
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
10
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
11
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
12
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
13
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
14
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
15
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
16
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
17
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
18
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
19
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
20
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल

संमेलनातूनही विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 00:16 IST

शिक्षणासोबत विद्यार्थी सर्वगुणसंपन्न व्हावा. क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे सुप्तगुण व कला प्रदर्शित होतात. त्यामुळे स्रेहसंमेलनातूनही विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होतो, असे मत माजी आमदार केशव मानकर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देकेशव मानकर : चोपा येथील रवींद्र विद्यालयाचा वार्षिकोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : शिक्षणासोबत विद्यार्थी सर्वगुणसंपन्न व्हावा. क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे सुप्तगुण व कला प्रदर्शित होतात. त्यामुळे स्रेहसंमेलनातूनही विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होतो, असे मत माजी आमदार केशव मानकर यांनी व्यक्त केले.तालुक्यातील ग्राम चोपा येथील रवींद्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन समारंभात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उद्घाटन डॉ.नामदेव किरसान यांच्या हस्ते करण्यात आले. वक्ते म्हणून एडमिनिस्ट्रेटीव्ह सर्व्हिसेस पदवी कॉलेज (नागपूर) येथील प्राचार्य धमेंद्र तुरकर तर पाहुणे म्हणून म्हणून भवभूती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश असाटी, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, पं.स. सभापती दिलीप चौधरी, भाजप तालुकाध्यक्ष डॉ. लक्ष्मण भगत, सरपंच कुसन भगत, माजी प्राचार्य डी.आर. कटरे, काशीराम हुकरे, वाय.डी. चौरागडे, प्राचार्य आर.आर. डे, पर्यवेक्षक एच.बी. राऊत, प्रा.डी.डी. लोखंडे, स्रेहसंमेलन प्रभारी एल.बी. मेश्राम, एस.जी. पटले, विद्यार्थी प्रतिनिधी सारंग गोळंगे, टिष्ट्वंकल पारधी, उर्वशी बिसेन उपस्थित होते.पुढे बोलताना मानकर यांनी, भवभूती शिक्षण संस्थेत शिकणारा प्रत्येक विद्यार्थी आदर्श घेवून समाजात उत्कृष्ट कार्य करणारा बनावा. उच्च शिक्षित होऊन स्वपालनासह सामाजिक, राजकीय, व्यावसायिक क्षेत्रात आपले नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.डॉ. किरसान यांनी, विद्यार्थ्यांना शिस्त व अभ्यासू प्रवृत्तीबाबत मार्गदर्शन केले. भाजपा जिल्हाध्यक्ष पटले यांनी, गुरुजींच्या शिक्षण व्यवस्थेची व ग्रामीण मुलांना सुसंस्कृत करण्यासाठीच संस्थेची स्थापना केली व या संस्थेत आजही संस्कृती टिकून आहे, असे सांगितले.या वेळी प्राचार्य तुरकर यांनी, विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी स्रेहसंमेलन हे मोठे दालन आहे. यातून विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्र, नाट्यक्षेत्र, अभिनेता, नेता बनण्याची संधी मिळते, असे मत व्यक्त केले. रविंद्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा, सामाजिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा यातून विद्यार्थी राज्यस्तरापर्यंत जातात, याची माहिती प्राचार्य रंजितकुमार डे यांनी प्रास्ताविकातून दिली.या वेळी विद्यार्थ्यांनी लेझीम, स्काऊट गाईड सह विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. संचालन प्रा. डी.एस. खोटेले यांनी केले. आभार एल.बी. मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.