शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अजितदादा धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2018 19:37 IST

भरधाव इंडिका कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका नादुरूस्त ट्रकला धडक दिली. यात कारमधील तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारी (दि.२४) सायंकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास गोंदिया-भंडारा मार्गावरील संराडी गावाजवळ घडली. दरम्यान याच मार्गाने तिरोडा येथे प्रचारसभेकरीता जात असलेले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री अनिल देशमुख यांनी आपला ताफा थांबवून अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून गेले.

 गोंदिया - भरधाव इंडिका कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका नादुरूस्त ट्रकला धडक दिली. यात कारमधील तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारी (दि.२४) सायंकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास गोंदिया-भंडारा मार्गावरील संराडी गावाजवळ घडली. दरम्यान याच मार्गाने तिरोडा येथे प्रचारसभेकरीता जात असलेले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री अनिल देशमुख यांनी आपला ताफा थांबवून अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून गेले. तसेच जखमींना कारमधून बाहेर काढून त्यांना आपल्या ताफ्यातील वाहनाने त्वरीत जखमींना तिरोडा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तिरोडा येथील कार्यकर्त्यांना फोन करुन जखमींवर वेळीच उपचार व्हावा, याची काळजी घेण्यास सांगितले. अपघातातील तिन्ही जखमींवर तिरोडा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. प्राप्त माहितीनुसार भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रि.पा., रिपाईच्या अधिकृत उमेदवाराच्या निवडणूक प्रचारार्थ गुरूवारी सायंकाळी ५ वाजता तिरोडा येथे आयोजित सभेकरीता माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासह अन्य पदाधिकारी नागपूरवरुन वाहनाने तिरोडा जात होते. दरम्यान तिरोड्यापासून ५ कि.मी.अंतरावर असलेल्या सरांडी गावाजवळ एका इंडिका वाहनाने रस्ताच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. यात इंडिका कारमधील तीन जण गंभीर झाले. हा अपघात अजित पवार यांच्यासमोर झाला. त्यांनी लगेच वाहन चालकाला गाडी थांबविण्यास सांगितले. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता ते गाडीतून उतरुन अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले. पवार व देशमुख यांनी स्वत: इंडिका वाहनातील जखमींना बाहेर काढले. त्यांच्याच ताफ्यातील एका वाहनाने सर्व जखमींना तातडीने तिरोडा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. ज्या तळमळीने पवार हे अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून गेले. त्यावरुन त्यांच्यातील मदतीला धावून जाणाºया माणसाचे दर्शन सुध्दा या मार्गावरुन जात असलेल्या वाहनचालक व गावकºयांना घडले. दरम्यान वृत्त लिहीपर्यंत जखमींची नाव कळू शकली नाही. तिरोडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप कोळी हे घटनास्थळी रवाना झाले होते.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारMaharashtraमहाराष्ट्र