शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

रासायनिक खतांच्या किमतीत पुन्हा वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 18:16 IST

दुष्काळात तेरावा महिना: खरिपात बसणार मोठा आर्थिक फटका

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : आगामी खरीप हंगामापूर्वीच रासायनिक खतांच्या भावात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार असून, शेतमालाच्या उत्पादन खर्चात वाढ होणार आहे.

शेतीसाठी रासायनिक खतांचा वापर जवळपास अनिवार्यच झाला आहे. त्यामुळे शेतीच्या उत्पादन खर्चात रासायनिक खताच्या किमती महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यात गेल्या काही वर्षांत सततची वाढच होत असल्याने शेतकऱ्यांचे गणित बिघडत असल्याची स्थिती आहे. जिल्ह्यात खरिपाची पेरणी जून महिन्यात होत असली तरी मे महिन्यापासूनच खताची खरेदी होते. शिवाय बेसल डोस देणे आवश्यक असल्याने खताची आतापासूनच मागणी होत आहे. अशातच रासायनिक खतांच्या भावात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे.

मिश्र खते, सुपर पोटॅशच्या भावातही मोठी वाढ झाली असून, डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टरच्या आधारे होणाऱ्या आंतरमशागतीच्या खर्चातही मोठी वाढ झाली आहे. ट्रॅक्टरने होणाऱ्या नांगरणीच्या खर्चात प्रति एकर ३०० रुपयांपर्यंत वाढ, खोल नांगरणीचा खर्च दोन हजार रुपये प्रति एकरवर पोहोचला आहे. इतरही खर्चात वाढ झाल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली असून यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी मोठी आर्थिक कसरत करणारा ठरणार असून या हंगामात शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागण्याची शक्यता आहे.

आर्थिक गणित कोलमडणारखत, बियाणे, रोजगार, अन् मशागतीसाठी लागणारे यंत्र याच्या बाजारभावात नियमित वाढच होत आहे.मात्र शेतमालाचे बाजारभाव स्थिर अन् घटतेच आहेत. गेल्या दोन वर्षांपासून धानाचा हमीभाव अडीच हजारांच्या खालीच आहेत.त्यामुळे शेतमालाचे बाजारभाव घटणारे अन् खर्च मात्र वाढतच असल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडत असल्याचे चित्र आहे.

खताचे पूर्वीचे व सध्याचे दर खते                                  सध्याचे दर                       खतांचे जुने दर१०-२६-२६                            १७००                                  १४७०२४-२४-०                              १७००                                  १५५०२०-२०-०-१३                          १४५०                                  १२५०सुपर फॉस्फेट                          ६००                                    ५००

उत्पादन खर्चात वाढ होत असताना शेतमालाच्या भावात मात्र घट होत आहे. यामुळे शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. उत्पादन खर्चात सर्वात महत्त्वाचा घटक असलेल्या खतांच्या भावातच वाढ होत असल्याने शेती आता आर्थिकदृष्ट्या परवडणारी नाही.- निहारीलाल दमाहे, शेतकरी 

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील खतांच्या वाढत्या किमतीचा परिणाम आपल्या देशात दिसून येतो. युरिया साधारणपणे १५ ते २० टक्के, पोटॅश १०० टक्के, सुपर फॉस्फेट ६० ते ७० टक्के बाहेरील देशातून आयात केले जाते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खतांच्या किमतीवाढल्याचा परिणाम देशात जाणवतो. - मनीष रहांगडाले, खत विक्रेता

मजुअरीतही वाढएकीकडे खतांसह इतर कृषी निविष्ठांच्या किमती गगनाला भिडत असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ होत आहेच, शिवाय दरवर्षी मजुरीतही मोठी वाढ होत आहे. त्यात वेळेवर कामासाठी मजूरही मिळणे कठीण असल्याने शेती करावी की, नाही असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित होत आहे.

 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFertilizerखतेFarmerशेतकरी