पुन्हा १३ शेतकऱ्यांचे धानाचे पुंजणे जाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 06:00 AM2019-11-30T06:00:00+5:302019-11-30T06:00:19+5:30

जिल्ह्यात सध्या खरीप हंगामातील धान कापणी आणि मळणीचा हंगाम सुरू आहे.बºयाच शेतकºयांनी धानाची कापणी करुन त्याची मळणी करण्यासाठी शेतात धानाचे पुंजणे तयार करुन ठेवले आहे. शेतकरी मजूर आणि मळणी यंत्र मिळाल्यानंतर धानाची मळणी करु अशा बेतात होते. मात्र दोन दिवसांपूर्वीच चिचगडसह सहा गावातील ४० हून अधिक शेतकºयांचे ८० धानाचे पुंजणे जाळले.

Again, the burnt grain of 13 farmers | पुन्हा १३ शेतकऱ्यांचे धानाचे पुंजणे जाळले

पुन्हा १३ शेतकऱ्यांचे धानाचे पुंजणे जाळले

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण : लाखो रुपयांचे नुकसान, पोलिसांसमोर आव्हान, नुकसानीचे पंचनामे सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
चिचगड : देवरी तालुक्यातील चिचगडसह सहा गावातील ४० हून अधिक शेतकºयांचे धानाचे पुंजणे अज्ञात इसमाने जाळल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली. ही घटना ताजी असताना पुन्हा शुक्रवारी (दि.२९) चिचगडपासून १२ कि.मी.अंतरावर असलेल्या १३ शेतकºयांचे धानाचे पुंजणे जाळल्याची घटना उघकीस आली. दरम्यान याप्रकारामुळे शेतकºयांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आपल्या शेतातील धानाचे पुंजणे सुरक्षीत ठेवण्यासाठी त्यांच्यावर शेतात पहारा देण्याची वेळ आली आहे.
जिल्ह्यात सध्या खरीप हंगामातील धान कापणी आणि मळणीचा हंगाम सुरू आहे.बºयाच शेतकºयांनी धानाची कापणी करुन त्याची मळणी करण्यासाठी शेतात धानाचे पुंजणे तयार करुन ठेवले आहे. शेतकरी मजूर आणि मळणी यंत्र मिळाल्यानंतर धानाची मळणी करु अशा बेतात होते. मात्र दोन दिवसांपूर्वीच चिचगडसह सहा गावातील ४० हून अधिक शेतकºयांचे ८० धानाचे पुंजणे जाळले. यात शेतकऱ्यांचे ४५ लाख रुपयांचे नुकसान झाले. या घटनेचे पंचनामे सुरू असतानाच शुक्रवारी पहाटे चिचगडपासून १२ कि.मी.अंतरावर असलेल्या कडीकसा येथील १३ शेतकऱ्यांचे धानाचे पुंजणे जाळण्यात आल्याची घटना उघडकीस आली. याची माहिती गावकरी आणि शेतकऱ्यांना होताच त्यांनी शेतातकडे धाव घेत पुंजण्यांना लागली आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र ही आग रात्रीच्या सुमारास लावली असल्याने संपूर्ण धानाचे पुंजणे जळून राख झाले. यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढावले आहे. शेतकऱ्यांनी वर्षभर रक्ताचे पाणी करुन आणि राबराब राबून पीक घेतले. धानाची मळणी करुन बँका आणि देणीदारांची देणी फेडू अशा विचारात शेतकरी होते. मात्र धानाचे पुंजणे जळाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. दोन दिवसाच्या अंतराने पुन्हा ही घटना घडल्याने ज्या शेतकऱ्यांचे धानाचे पुंजणे शेतात आहेत ते दहशतीत असून त्यांना आता रात्री शेतात पहारा देण्याची वेळ आली. दरम्यान या घटनेची माहिती शेतकऱ्यांनी देवरीचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार,कृषी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. चिचगड पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदविली आहे. कृषी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे करुन अहवाल तहसील कार्यालयाकडे पाठविला आहे.

पुंजण्यांना आग लावणारा कोण?
चिचगडसह सहा गावातील ८० अधिक धानाच्या पुंजण्यांना अज्ञात इसमाने आग लावली. यात शेतकऱ्यांचे ४५ लाख रुपयांचे नुकसान झाले. त्यानंतर पुन्हा शुक्रवारी कडीकसा येथील १३ शेतकऱ्यांच्या शेतातील धानाचे पुंजणे जाळण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण असून धानाचे पुंजणे जाळण्यामागील नेमके कारण काय आणि पुंजणे जाळणार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या घटनेने पोलिसांसमोर सुध्दा आव्हान उभे ठाकले आहे.
शेतकऱ्यांचा शेतात पहारा
चिचगड परिसरात धानाचे पुंजणे जाळण्याचा प्रकार सुरूच असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये धानाचे पुंजणे तयार करुन ठेवण्यात आले असून या घटनेमुळे ते सुध्दा सुरक्षीत राहण्याची शक्यता नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी आता शेतात रात्रीच्या वेळी पहारा देण्यास सुरूवात केली आहे.
दुहेरी संकटाचा सामना
परतीच्या पावसामुळे आधीच धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यातून काही प्रमाणात धान शिल्लक होते. मात्र त्या धानाच्या पुंजण्यांना जाळल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला असून त्यांच्यावर दुहेरी संकट निर्माण झाले आहे.
१३ शेतकऱ्यांचे नुकसान
कडीकसा येथील दारूसिंग हलामी, रासो ताराम, छन्नो कुंभरे, सुमो धावडे,भानुराम गुरुपंच, मुऱ्हा कुंभरे, दशरथ धावडे,चमली ताराम, चैतराम हलामी, प्रकाश ब्बोगा, माहू हलामी, नारायण टेंभुर्णे, छगन अहामी या १३ शेतकऱ्यांच्या शेतातील धानाचे पुंजणे शुक्रवारी जाळण्यात आले. यामुळे २९ हेक्टरीमधील धानाची संपूर्ण राख झाली असून २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महसूल विभागाने वर्तविला आहे.

Web Title: Again, the burnt grain of 13 farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.