शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सहा वर्षांनंतर उडाला बैलगाडी शर्यतीचा धुरळा; १०८ बैलजोड्यांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2022 17:34 IST

नवेगावबांध येथे तब्बल सहा वर्षांनंतर बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडाला. यामुळे पट शौकिनांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

ठळक मुद्देनवेगावबांध येथे दोन दिवसीय बैलगाडा शर्यतीत गर्दी

नवेगावबांध (गोंदिया) : तब्बल सहा वर्षांनंतर बैलगाडा शर्यतीचे आयोजन नवेगावबांध येथील बैलगाडा शर्यत समितीद्वारा आयोजित करण्यात आले होते. बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.

या शर्यतीकरिता १०८ बैलजोड्यांनी बैलगाडा शर्यतीत भाग घेतला. नवेगावबांध या ठिकाणी दरवर्षी संक्रांतीमध्ये बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जात होते. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत या ठिकाणी भरविली जात होती. काही दिवसांनंतर या ठिकाणी पटाची जागा इतर शासकीय कार्यालयासाठी देण्यात आल्याने व काही जागेवर अतिक्रमण झाल्याने पट भरविणे संपुष्टात आले होते, नंतर पुन्हा या ठिकाणी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले, परंतु उच्च न्यायालयाच्या बैलगाडा शर्यतीवरील बंदीनुसार हे सर्व बंद झाले होते. पुन्हा एकदा यावरील बंदी उठविल्यानंतर नवेगावबांध येथे तब्बल सहा वर्षांनंतर बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडाला. यामुळे पट शौकिनांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तीन राज्यांतील, तसेच विदर्भातील भंडारा, गोंदिया, अमरावती या तीन राज्यांतील १०८ बैलजोड्यांनी या शर्यतीत भाग घेतला होता. ४५ सेकंदांच्या आत आलेल्या ८६ जोड्या अंतिम फेरीत उतरल्या. त्यापैकी सात बैलजोड्यांना रोख पारितोषिके देण्यात आली.

उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य रचना गहाणे यांच्या हस्ते झेंडा पूजन करून करण्यात आले. यावेळी सरपंच अनिरुद्ध शहारे, उपसरपंच रघुनाथ लांजेवार उपस्थित होते. विजेत्या बैलजोड्यांना उपसरपंच रघुनाथ लांजेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नवल चांडक विलास कापगते जगदीश पवार यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले. टिकाराम संग्रामे, जगदीश पवार, खुशाल काशीवार, पंचायत समिती सदस्य होमराज पुस्तोडे, नंदागवळी यांनी निर्णायक मंडळाचे काम पाहिले.

टॅग्स :Bull Cart Raceबैलगाडी शर्यतgondiya-acगोंदियाSocialसामाजिक