शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

अजब प्रेमाची गजब कहानी.. 'त्याला' मिळविण्यासाठी तिने चक्क त्याच्या बायकोच्याच हत्येचा केला प्लान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2022 11:29 IST

त्याला नवरा बनविण्यासाठी चक्क त्याच्या बायकोचा ‘गेम’ करण्याचा प्लान तिने तयार केला. चार लाखांत तिची सुपारी दिली.

ठळक मुद्देअजब प्रेमाची धक्कादायक कहाणीमुलीच्या टाहोने फोडला पाझर

नरेश रहिले

गोंदिया : खेळण्या-बागडण्याच्या वयात प्रेमाची भाषा समजणारे मुले-मुली तरुण वयात कोणत्या स्तराला जातात याचेच एक उदाहरण म्हणजे गोंदियातील एका वकील महिलेचे प्रकरण आहे. अगदी बालवयापासून तर प्राथमिक शिक्षण ज्या मुलासोबत घेतले; आज तो दोन मुलींचा पिता असतानाही त्याला नवरा बनविण्याची मनोमन इच्छा वकील महिलेने ठेवली. त्याला नवरा बनविण्यासाठी चक्क त्याच्या बायकोचा ‘गेम’ करण्याचा प्लान तिने तयार केला. चार लाखांत तिची सुपारी दिली. परंतु ज्याला सुपारी दिली त्याला घर दाखविले. खून करायचा आहे, ती व्यक्ती त्याला निश्चित माहित असावी म्हणून सुपारी घेणाऱ्यासोबत 'तिने' घर गाठले.

सोनमचे(बदललेले नाव) पती आकाश हे लहान असताना त्यांच्यासोबत कॉन्व्हेंटपासून तर प्राथमिक शिक्षण सोबत घेणाऱ्या वकील महिलेचे प्रेम त्यांच्यावर जडले. नंतर ती विद्यार्थिनी आता वकील म्हणून कार्यरत आहे. परंतु प्राथमिक शिक्षणानंतर त्या दोघांचाही संपर्क झाला नाही. वयात आल्यावर दोघांचेही वेगवेगळे लग्न झाले. आशिष शर्माला दोन मुली, तर आरोपी वकील महिलेला एक मुलगी आहे. परंतु वकील महिला ही आशिष शर्मावर प्रेम करीत असल्याने त्याची पत्नी सोनम हिचा काटा काढण्याचा गेम वकील महिलेने तयार केला.

तीन महिन्यांपूर्वी चांदपूरला जाण्यासाठी भाड्याचे वाहन घेतले त्या भाड्याच्या वाहनाचा चालक सूरज केशव रावते (५०, रा. टी.बी. टोली), गोंदिया याला तिने सुपारी घेण्यासाठी तयार केले. आपल्या घरातील एक समस्या दूर करण्यासाठी सूरजने वकील महिलेला विनवणी केली होती. त्या समस्येच्या निवारणाच्या बदल्यात वकील महिलेने सोनमची सुपारी दिली होती. परंतु त्याने सुपारी घेण्यास नकार दिल्याने त्याला चार लाखांचे आमिष दिले. पैशाच्या लोभापायी सूरज रावते याने सोनमचा खून करण्याची तयारी दर्शविली.

सोनमची ओळख व तिचे घर दाखविण्यासाठी वकील महिला आरोपी सूरजच्या दुचाकीवर बसून तिच्या गणेशनगर येथील घरापर्यंत गेली. घराच्या काही अंतरावर थांबून वकील महिलेने सूरजला कुरिअर बॉय म्हणून फोन करण्यास सांगितले. कुरिअरचे पार्सल घेण्यासाठी आलेल्या सोनमवर चाकूने वार करण्याचा इशारा वकील महिलेने करताच आरोपी सूरजने तिच्यावर चाकूने हल्ला केला, अशी माहिती सूरज रावते याने पोलिसांना दिली आहे. ‘बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे...’ हे सांगणारा प्रसंग लहानपणात झालेल्या प्रेमाला आता मिळविण्यासाठी एका निरपराध महिलेच्या जीवावर बेतत होता हे खरे.

सूरजला सोनमने धरून आपटले

सूरजने कमरेत खोचलेला चाकू काढून सोनमच्या गळ्यावर मारत असताना त्या चाकूला अडविण्यासाठी सोनलने हात पुढे केल्याने चाकू तिच्या हाताला लागला. यावेळी सोनमने आरोपी सूरजला उचलून जमिनीवर आपटताच वकील महिला पायीच धावत धावत घराबाहेर सुटली. आरोपी सूरजही तिथून आपली सुटका करून वाहन घेऊन पसार झाला.

मुलीचा टाहो अन् पाझरले सूरजचे मन

सोनमचा खून करण्यासाठी गेलेल्या सूरजने तिच्यावर चाकूने हल्ला करताच त्याच्या पाठीवर असलेली बॅग सोनमची १३ वर्षांची मुलगी ओढत आरडाओरड करीत होती. माझ्या आईला मारू नका, हा तिचा टाहो सूरजच्या कानी पडताच आपल्यालाही तीन मुली आहेत ही भावना त्याच्या मनात आली. त्याचेही मन कळवळू लागले आणि त्याने तिला सोडून पळ काढला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीadvocateवकिलgondiya-acगोंदियाPoliceपोलिस