शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi Oath-Taking Ceremony Live: नरेंद्र मोदी PM पदाच्या हॅटट्रिकसाठी सज्ज; ६९ खासदार घेणार मंत्रिपदाची शपथ
2
"आम्ही वाट पाहायला तयार"; अजित पवारांनी सांगितले मंत्रिपद नाकारण्याचे कारण
3
गुजरात ६, बिहार ८, यूपी ९, महाराष्ट्र...; जाणून घ्या, कोणत्या राज्यातून कुठल्या नेत्याची लागूशकते मंत्रीपदी वर्णी?
4
NCP : राष्ट्रवादीला केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपद का नाही? प्रफुल्ल पटेल यांनी सगळंच सांगितलं
5
नारायण राणे, स्मृती इराणी, अन्...; या कॅबिनेटमध्ये दिसणार नाहीत मोदी सरकार 2.0 मधील हे 20 दिग्गज चेहरे?
6
राष्ट्रवादी काँग्रेसला सध्या एकही मंत्रिपद का नाही? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट शब्दात सांगितलं कारण
7
एकाचे वय 36 तर दुसऱ्याकडे 5000 कोटींची संपत्ती; केंद्रात TDP च्या 'या' दोन खासदारांना संधी
8
व्हीके पांडियन यांची राजकारणातून निवृत्ती; नवीन पटनायक आणि BJD ची मागितली माफी...
9
30 हजार पॅलेस्टाईन समर्थकांचा व्हाईट हाऊसला घेराव, जो बायडन यांच्या विरोधात निदर्शने
10
HDFC बँक ग्राहकांसाठी खुशखबर! EMI चा बोजा कमी होणार; वाचा बँकेचं प्लॅनिंग
11
'मातोश्री'कडून आमदार भास्कर जाधवांवर सोपवली मोठी जबाबदारी
12
Srishti Jain : "कोणाला उचलून घेऊन आलात?"; अभिनेत्री ढसाढसा रडली, सर्वांसमोर झालेला अपमान
13
'2047 पर्यंत भारत विकसित देश बनणार...' शपथविधीपूर्वी नरेंद्र मोदींची संभाव्य मंत्र्यांसोबत बैठक
14
'तारक मेहता..'मधली नवी 'सोनू' बोल्डनेसमध्ये भिडे मास्तरांच्या जुन्या सोनूलाही देतेय टक्कर
15
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ची संभाव्य तारीख आली समोर! पण, मोदी सरकारमुळे पाकिस्तानची कोंडी 
16
"सगळ्यात जास्त फायदा प्रफुल्ल पटेलांना"; मंत्रिपदावरुन अजितदादांबाबत रोहित पवारांचा मोठा दावा
17
पंकजा मुंडे यांचा पराभव जिव्हारी, ऊसतोड कामगार युवकाने संपवले जीवन
18
Sunita Rajwar : "मी खूप संघर्ष केला, आई-वडिलांनी..."; ट्रक ड्रायव्हरची मुलगी बनली लोकप्रिय अभिनेत्री
19
जंक फूड, प्रोसेस्ड फूड खायला आवडतं? आताच थांबा; कॅन्सरसह 'या' आजारांचा मोठा धोका
20
Jayant Patil : "समुद्र नाही याची पुणेकरांना खंत होती म्हणूनच की काय भाजपाने पुण्यात समुद्रही आणून दाखवला"

‘उन्नत शेती’ तंत्रज्ञान प्रचार मोहीम उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2019 11:42 PM

महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्तवतीने मौजा धामणगाव येथे शनिवारी (दि.२५) ‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ तंत्रज्ञान प्रचार मोहिमेची सुरूवात करण्यात आली. अध्यक्षस्थानी सरपंच छत्रपाल रहांगडाले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्तवतीने मौजा धामणगाव येथे शनिवारी (दि.२५) ‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ तंत्रज्ञान प्रचार मोहिमेची सुरूवात करण्यात आली.अध्यक्षस्थानी सरपंच छत्रपाल रहांगडाले होते. प्रमुख पाहुणे म्हणून विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी अध्यक्ष लक्ष्मण टेंभरे, पोलीस पाटील सुखदेव गायधने तर मार्गदर्शक म्हणून तालुका कृषी अधिकारी एल.एच.बंसोड, पशुधन विकास अधिकारी पटेल, प्रविण मुंढे उपस्थित होते. सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व दिपप्रज्वलन करुन सुरुवात करण्यात आली.याप्रसंगी सेंद्रीय शेती गट प्रमुख संतोष पारधी यांनी, सेंद्रीय शेतीचे महत्व पटवून दिले. त्याचप्रमाणे ‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ मोहिमेंतर्गत शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करुन आपल्या शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी आवाहन केले. बन्सोड यांनी, कृषी विभागाच्या विविध योजना, बियाण्यांची निवड, निंबोळी अर्कचा वापर, खताचा समतोल वापर, जैविक किटकनाशकाचा वापर करणे, श्री पद्धतीने भाताची लागवड, जैविक किटकनाशकाचा वापर करणे, हिरवळीच्या खताचा वापर, कमी कालावधीत येणाºया धानाचा वापर करुन रब्बी हंगामात गहू, हरभरा, ,लाखोळी, जवस इ. पिकाची लागवड करणे विषयी मार्गदर्शन केले.पटेल यांनी, जनावरांची निगा कशी राखावी, सुधारीत जातीच्या गाईचे संगोपन, पावसाळ्यात जनावरांना होणाºया आजारांची माहिती दिली. शहारे यांनी, बँकांमार्फत मिळणाºया विविध योजनांची माहिती दिली. प्रसंगी मंडळ कृषी अधिकारी मुंढे यांनी सुध्दा शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक जी.ए.चौधरी यांनी मांडले. संचालन सुषमा शिवणकर यांनी केले. आभार राहुल सेंगर यांनी मानले. कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व कृषी सहायक उपस्थित होते. 

टॅग्स :agricultureशेती