जिल्ह्यात आणखी २२ कोरोना बाधितांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 05:00 AM2020-08-07T05:00:00+5:302020-08-07T05:00:50+5:30

गुरूवारी आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये गोंदिया येथील ११, आमगाव तालुक्यातील २, गोरेगाव तालुक्यातील २, सडक अर्जुनी तालुक्यातील १ आणि तिरोडा तालुक्यातील ६ जणांचा समावेश आहे. गोंदिया व तिरोडा तालुक्यातील कोरोना बाधित रुग्ण वाढीचा वेग कायम असल्याने प्रशासन सुध्दा चिंतेत आहे. तिरोडा नगर परिषदेने कोरोनाचा साखळी खंडीत करण्यासाठी गुरूवारपासून तीन दिवस जनता कर्फ्यू जाहीर केला आहे.

Addition of 22 more corona victims in the district | जिल्ह्यात आणखी २२ कोरोना बाधितांची भर

जिल्ह्यात आणखी २२ कोरोना बाधितांची भर

Next
ठळक मुद्देकोरोना अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २०९ वर : २५० बाधितांची कोरोनावर मात

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत मागील पाच दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. सहा दिवसात जिल्ह्यात दोनशे कोरोना बाधितांची नोंद झाली आहे.गुरूवारी (दि.६) पुन्हा २२ कोरोना बाधितांची भर पडल्याने जिल्ह्यातील कोरोना अ‍ॅक्टीव रूग्णांची संख्या २०९ वर पोहचली आहे. तर ४ कोरोना बाधित कोरोनामुक्त झाल्याने आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या २५० वर पोहचली आहे.
गुरूवारी आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये गोंदिया येथील ११, आमगाव तालुक्यातील २, गोरेगाव तालुक्यातील २, सडक अर्जुनी तालुक्यातील १ आणि तिरोडा तालुक्यातील ६ जणांचा समावेश आहे. गोंदिया व तिरोडा तालुक्यातील कोरोना बाधित रुग्ण वाढीचा वेग कायम असल्याने प्रशासन सुध्दा चिंतेत आहे. तिरोडा नगर परिषदेने कोरोनाचा साखळी खंडीत करण्यासाठी गुरूवारपासून तीन दिवस जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. पहिल्याच दिवशी जनता कर्फ्यूला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. तर गोंदिया शहरात सुध्दा रुग्ण वाढत असल्याने शनिवार आणि रविवारी दोन दिवस जनता कर्फ्यू जाहीर करण्याची प्रक्रिया प्रशासनातर्फे सुरू करण्यात आली आहे.
गुरूवारी याच विषयाला घेवून स्थानिक प्रशासन आणि व्यापाऱ्यांची बैठक पार पडली. जिल्ह्यात दररोज कोरोना बांधितांची संख्या वाढत असताना मात्र प्रशासनाकडून उपाययोजना करण्यास मात्र कुचराई केली जात असल्याचे चित्र आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने नागरिकांनी सुध्दा स्वत:ची काळजी घेण्याची गरज आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच आपल्या समोरील व्यक्ती हा कोरोना बाधित आहे असे समजून स्वत:ची आपल्या कुटुंबांची काळजी घ्यावी.

९७८४ स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्ह
कोरोना संसर्गाच्या अुनषंगाने प्रयोगशाळेत आतापर्यंत एकूण १० हजार ४२० जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. यापैकी ४८६ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले. तर ९ हजार ७८४ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. १४५ स्वॅब नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रयोगशाळेकडून जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त व्हायचा आहे. तर १४३ स्वॅब नमुन्यांचा अहवाल अनिश्चित आहे. कोरोना बाधित रुग्णांचा शोध घेण्यासाठी रॅपिड अँटीजेन टेस्ट घेतली जात असून आतापर्यंत एकूण ३३१५ स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. यापैकी ३२७९ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. तर ३४ स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे.

Web Title: Addition of 22 more corona victims in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.