लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दिव्यांगत्व प्रमाणपत्र जोडून नोकरीवर लागलेल्या दिव्यांग शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी केली जात आहे. यात गोंदिया जिल्ह्यातील २४ वर शिक्षकांचा समावेश आहे. या शिक्षकांना तपासणी करून त्याचा अहवाल १५ फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचे पत्र शिक्षणाधिकारी विशाल डोंगरे यांनी दिव्यांग शिक्षकांना दिले आहे. मुदतीत अहवाल सादर न करणाऱ्या शिक्षकांवर कारवाई केली जाणार आहे.
दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारावर नोकरी लाटून खऱ्या दिव्यांगांवर अन्याय करण्यात आला आहे. अशी तक्रार अपंग कर्मचारी संघटनेने राज्य दिव्यांग विभागाकडे करण्यात आली. दरम्यान, बोगस दिव्यांग प्रमाणपत्र धारकांची यादीही विभागाकडे सादर करण्यात आली. त्यानुरूप गोंदिया जिल्ह्यातील संशयास्पद २४ वर शिक्षकांसमोर दिव्यांग तपासणीच्या कसोटीवर खरे उतरण्याचे आवाहन उभे झाले आहे. या संदर्भात जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांनी त्या शिक्षकांना पत्र देऊन तपासणी अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. गोंदिया जिल्ह्यात संशयास्पद व तात्पुरत्या वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारावर बोगस दिव्यांग प्रमाणपत्र तयार करून नोकरी लाटण्यात आल्याची तक्रार राज्य दिव्यांग विभागाकडे करण्यात आली आहे. त्यानुरूप राज्याच्या दिव्यांग विभागाकडून गोंदिया जिल्ह्याच्या शिक्षण विभागाकडून संबंधित शिक्षकांची शहानिशा करून, तसेच अहवाल सादर करण्यात यावे, निर्देश दिले आहेत.
२४ संशयास्पद दिव्यांग शिक्षकांची यादीही गोंदिया शिक्षण विभागाला पुरविण्यात आली आहे. या अनुषंगाने शिक्षणाधिकारी गोंदिया यांनी सर्व पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी यांना संबंधित शिक्षकांना १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत विहित प्रपत्र दिव्यांग कल्याण विभागाकडे उलट तपासणी अहवाल सादर करण्यात यावा, अशा सूचना केल्या आहेत.
यामुळे गोंदिया जिल्ह्यातील ३० संशयास्पद दिव्यांग शिक्षकांना प्रमाणपत्राच्या सत्यापनासाठी तज्ज्ञ डॉक्टरांपुढे तपासणीची परीक्षा द्यावी लागणार आहे. यामध्ये कर्णबधिर, दृष्टिदोष, अस्थिव्यंग या प्रकारातील दिव्यांग शिक्षकांचा समावेश आहे.
त्या संशयास्पद शिक्षकांची यादी दिली
महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनांच्यावतीने बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारावर नोकरी लाटण्यात आल्याची तक्रार करण्यात आली. यात गोंदिया जिल्ह्यातील २४ दिव्यांग शिक्षकांच्या प्रमाणपत्रावर संशय व्यक्त करण्यात आला. बोगस दिव्यांग शिक्षकांच्या यादीत कर्णबधिर - २, दृष्टिदोष- ८, तर अस्थिव्यंग १४ शिक्षकांचा समावेश आहे.
"दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारावर नोकरीवर लागलेल्या त्या शिक्षकांना दिव्यांगत्व तपासणीचा अहवाल १५ फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. मुदतीत प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या शिक्षकांवर नियमानुसार कारवाई केली जाईल."- विशाल डोंगरे, शिक्षणाधिकारी प्राथमिक
Web Summary : Gondia: Verification of disability certificates of 24 teachers underway. Failure to submit reports by February 15th will result in action, says Education Officer.
Web Summary : गोंदिया: 24 शिक्षकों के दिव्यांगता प्रमाणपत्रों का सत्यापन जारी। 15 फरवरी तक रिपोर्ट जमा न करने पर कार्रवाई होगी: शिक्षा अधिकारी।