शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
4
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
5
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
6
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
7
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
8
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
9
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
10
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
11
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
12
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
13
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
14
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
15
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
16
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
17
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
18
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
19
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
20
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
Daily Top 2Weekly Top 5

कौशल्यसेतू दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी वरदान

By admin | Updated: September 26, 2016 01:54 IST

कौशल्य सेतू २०१६’ हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम आहे. या उपक्रमांतर्गत इयत्ता दहावीच्या जुलै २०१६ मधील फेरपरीक्षेत

मिलिंद रंगारी : ८० टक्के प्रात्यक्षिक व ५० टक्के आकलनावर भरविजय मानकर  सालेकसाकौशल्य सेतू २०१६’ हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम आहे. या उपक्रमांतर्गत इयत्ता दहावीच्या जुलै २०१६ मधील फेरपरीक्षेत तीन किंवा तीनपेक्षा जास्त विषयात अनुत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत सहा महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रमात प्रवेश मिळणार आहे. ज्यात ८० टक्के प्रात्यक्षिक व ५० टक्के आकलनावर भर राहणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना विविध उद्योगधंद्यांमध्ये रोजगाराची संधी मिळणार असून याद्वारे ते आत्मविश्वासाने स्वयंरोजगार, रोजगार आणि उच्च तांत्रिक शिक्षण या वाटेने जाऊन प्रगती करू शकतील, अशी माहिती नागपूर शिक्षण मंडळाचे गोंदिया जिल्ह्यातील शिक्षक समुपदेक प्रा. मिलिंद रंगारी यांनी दिली.लोकमतला दिलेल्या खास मुलाखतीत प्रा.रंगारी यांनी सांगितले की, २४ सप्टेंबरला जिल्ह्यातील दहावीच्या वर्गशिक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले. त्यात नागपूर विभागातील नागपूर शहर १३६, नागपूर ग्रामीण ११९, गडचिरोली ४५, चंद्रपूर १३७, वर्धा १०४, भंडारा ९२ व गोंदिया जिल्ह्यातील ७५ शिक्षकांना तज्ज्ञ समुपदेशकांमार्फत प्रशिक्षण देण्यात आले आणि त्यानंतरच विद्यार्थ्यांच्या गणपत्रिका वितरित करण्यात आल्या. मुंबईच्या व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्था तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने सदर प्रशिक्षण देण्यात आले. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी खास तयार करण्यात आलेल्या मोबाईल अ‍ॅपची माहिती या वेळी देण्यात आली. उपस्थित सर्व वर्गशिक्षकांना स्मार्ट फोनवर सदर अ‍ॅप डाऊनलोड करून वर्गशिक्षकांनी नोंदणी केली. २६ सप्टेंबरला शाळेत विद्यार्थ्यांना गुणपत्रिका वितरित केल्या जातील व वर्ग शिक्षक या विद्यार्थ्यांना कौशल्य सेतू कार्यक्रमाबाबत मार्गदर्शन करुन त्यांच्ये आधार कार्ड लिंक करतील. संबंधीत डेटा नॅशनल युवा को-आॅपरेटिव्ह सोसायटी (एनवायसीएस) आणि यशस्वी संस्थेकडे हस्तांतरीत केल्यानंतर ते विद्यार्थ्यांशी संपर्क साधतील. (एमएसबीटीई) महाराष्ट्र स्टेट बोर्ड आॅफ टेक्नीकल एज्युकेशनच्या जिल्हा पातळीवरील शासकीय तंत्रनिकेतनच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करतील. नंतर सहा महिने कालावधीचा विद्यार्थ्यांच्या पसंतीचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम देण्यात येईल. हे प्रमाणपत्र अभ्यासक्रम दहावी समकक्ष समजण्यात येईल. तीन किंवा तीनपेक्षा जास्त विषयात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत ‘अनुत्तीर्ण’ या ऐवजी ‘कौशल्य सेतू पात्र’ असे लिहिण्यात आलेले आहे. काय आहे कौशल्यसेतू योजना ?कौशल्य सेतूच्या मागचा हेतू काय आहे, याबद्दल विचारले असता प्रा. रंगारी म्हणाले की, इयत्ता दहावीत अनेक विषयात अनुत्तीर्ण होण्याची कारणे वेगवेगळी आहेत, असे लक्षात येते. शिक्षणाच्या आवडीपासून तर कौटुंबिक, आर्थिक, मानसिक, आरोग्य व सोयीसुविधांची कारणे असू शकतात. अनुत्तीर्ण विद्यार्थी आपला आत्मविश्वास गमावतो. तसेच कुटुंब व समाज यांच्याकडून उपेक्षिल्या जातो. प्रगतीची त्याची संधी चुकल्यामुळे शिक्षणाची कपाटे बंद होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चिकरण होते व शिक्षणाबद्दल त्यांच्यात अनास्था निर्माण होते. त्यांच्या समाजाप्रति अनादर वाढू शकतो, असे विद्यार्थी नैराश्याने ग्रस्त होवून व्यसनाधिनता व गैरमार्गाकडे वळू शकतात. त्यामुळे त्यांना वेळीच सावध करुन रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने राबविलेली योजना म्हणजे ‘कौशल्य सेतू-२०१६’ अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना वरदान ठरणार ही अपेक्षा आहे.