शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
4
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
5
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
6
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
7
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
8
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
9
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
10
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
11
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
12
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
13
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
14
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
15
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
16
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
17
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
18
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
19
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

१५ शाळांत सुमारे ४८२ विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 00:16 IST

नगर परिषदेच्या शाळांमागे लागलेले पटसंख्या घसरणचे ग्रहण यंदाही काही सुटल्याचे दिसून येत नाही. कारण मागील वर्षी शाळांच्या सुरूवातीला प्राथमिक शाळांत असलेली ५३४ विद्यार्थी संख्या यंदा सुमारे ४८२ वर असल्याची आकडेवारी पालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून मिळाली आहे.

ठळक मुद्देनगर परिषद शाळांची घरघर : प्राथमिक शाळा आहेत आॅक्सीजनवर

कपिल केकत ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :नगर परिषदेच्या शाळांमागे लागलेले पटसंख्या घसरणचे ग्रहण यंदाही काही सुटल्याचे दिसून येत नाही. कारण मागील वर्षी शाळांच्या सुरूवातीला प्राथमिक शाळांत असलेली ५३४ विद्यार्थी संख्या यंदा सुमारे ४८२ वर असल्याची आकडेवारी पालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून मिळाली आहे. यावरून नगर परिषद शाळांतील विद्यार्थी पटसंख्येची घसरण कायम असल्याचे दिसते.आजघडीला शहरातील खाजगी शाळा पालिकेच्या शाळांवर वरचढ झाल्या आहेत. यात निकाल म्हणा की, पटसंख्या दोन्ही बाबतीत पालिकेच्या शाळा माघारलेल्या आहेत. खाजगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्याची वेळ येत असताना मात्र पालिकेच्या शाळांत आता शिक्षकांना विद्यार्थ्यांसाठी घरोघरी जाण्याची पाळी आली आहे. एकतर पालिकेच्या शाळांचा घसरत चाललेला दर्जा, त्यात निकालांत पालिकेची एकही शाळा १०० टक्के निकाल देत नसल्याने पालकांचाही कल आता खाजगी शाळांकडे वाढत चालल्याचे दिसून येत आहे. हेच कारण आहे की, कधी विद्यार्थ्यांनी खचाखच भरणाऱ्या पालिकेच्या शाळा आता ओस पडत आहेत.या नवीन शैक्षणिक सत्रात पालिकेच्या प्राथमिक शाळांत (वर्ग १ ते ४) फक्त ४८२ विद्यार्थ्यांची सध्या नोंद असल्याची माहिती मिळाली आहे. असे असतानाही या नाममात्र विद्यार्थ्यांसाठी पालिकेच्या १५ शाळा सुरू आहेत. एका खाजगी शाळेत हजारांवर विद्यार्थी असताना पालिकेच्या १५ शाळांत ४८२ विद्यार्थी असणे ही आश्चर्याची व तेवढीच चिंतनाची बाब आहे. घटत चाललेल्या पटसंख्येमुळे मात्र पालिकेच्या या शाळांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.मागील कित्येक वर्षांपासून पालिकेच्या शाळांना पटसंख्या गळतीचा हा रोग जडला आहे. मात्र यावर तोडगा काढण्यात पालिका प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. आता हे शैक्षणिक सत्र सुरू झाले असून ही पक्की संख्या नसून अद्याप प्रवेश सुरू आहेत. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत विद्यार्थ्यांची संख्या आणखी वाढणार असे अपेक्षीत आहे. मात्र त्यानंतरही पालिकेच्या शाळांची स्थिती खाजगी शाळांच्या तुलनेत गंभीरच राहणार आहे.बहुतांश शाळांत पटसंख्येची घसरणनगर परिषदेच्या बहुतांश शाळांत पटसंस्खेची घसरण मागील कित्येक वर्षांपासून सुरूच आहे. दरवर्षी विद्यार्थी नगर परिषदेच्या शाळा सोडून निघत असल्याने नगर परिषेला शाळा बंद करण्याची पाळी आली आहे. ही गंभीर व तेवढीच गांभीर्याने विचार करण्याजोगी बाब आहे. मात्र एवढ्यावरही नगर परिषद प्रशासन शाळांना घेऊन काही गंभीर झालेले दिसत नाही. हेच कारण आहे की, नगर परिषद शाळांना लागलेले पटसंख्या घसरणचे ग्रहण काही सुटलेले नाही. 

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा