शहरं
Join us  
Trending Stories
1
एकटे PM मोदीच आठवड्याला १०० तास काम करतात; '७० तास'वरून ट्रोल झालेल्या नारायण मूर्तींचं प्रशस्तीपत्रक
2
गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने कसे कमावले पैसे, भारतात स्थायिक होण्याचे कारणही सांगितले
3
धक्कादायक...! डोनाल्ड ट्रम्प यांना भारतात पाठवायचंय 'मांसाहारी दूध', सरकारचा स्पष्ट नकार; जाणून घ्या काय आहे हा संपूर्ण प्रकार?
4
"दीपक काटे चांगले काम करेल म्हटलं होतं, पण..."; गायकवाडांवरील हल्ल्याचा मंत्री बावनकुळेंनी केला निषेध
5
ऑस्कर पुरस्कार विजेते सत्यजित रे यांचे बांग्लादेशातील घर पाडले; भारताने दिलेली दुरुस्तीची ऑफर
6
राहुल गांधी पंतप्रधान होणार हे तुम्हाला माहितीये का?; उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला फटकारलं, प्रकरण काय?
7
रात्रीच्या अंधारातही हल्ला करू शकणारे अमेरिकेतून येणार अपाचे हेलिकॉप्टर; पाक सीमेवर होणार तैनात
8
टॉवेल-बनियान घालून विरोधक विधानभवनात; अनोख्या आंदोलनाने वेधले साऱ्यांचे लक्ष, सत्ताधारीही हसले
9
IND vs ENG 3rd Test: आयसीसीचा इंग्लंडला डबल दणका, लॉर्ड्स कसोटी जिंकूनही संघाचा मोठा तोटा! 
10
हॉट मॉडेल, राजघराण्याशी संबंध, रवी शास्त्रींसोबत दिसलेली ही महिला आहे तरी कोण?
11
निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला मिळाला नवा भिडू; एकनाथ शिंदेंनी भाजपाला शह देण्यासाठी आखली रणनीती?
12
८ वर्षांत पहिल्यांदाच GST मध्ये होणार बदल! PMO नं प्रस्तावाला दिली मंजुरी; तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
13
"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट
14
महात्मा गांधींच्या ९४ वर्षे जुन्या चित्राला लिलावात मिळाले १.७ कोटी, जाणून घ्या त्यात काय खास आहे?
15
विमानांच्या इंजिनांचे आयुष्य किती असते? एअर इंडियाच्या विमानाला होती अशी इंजिने, जी...
16
५ मुलांची आई अन् १३ वर्षांचा संसार; २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि जीव गमावला! नेमकं काय झालं?
17
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
18
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारची 'मिर्झापूर' सिनेमात एन्ट्री, 'या' अभिनेत्याच्या जागी दिसणार
19
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
20
गरमा गरम समोसे, गोड गोड जिलेबी की यम्मी पिझ्झा... आरोग्यासाठी काय आहे सर्वात घातक?

प्रतिकूल परिस्थितीत निर्णय घेण्याची क्षमता असावी

By admin | Updated: March 8, 2015 01:16 IST

स्वप्न बघावे तर ते साकारही करावे, कारण स्वप्नपूर्तीसाठी अनेक प्रतिस्पर्धी सज्ज आहेत. त्यात आपला घात होण्याची शक्यता असते.

कालीमाटी : स्वप्न बघावे तर ते साकारही करावे, कारण स्वप्नपूर्तीसाठी अनेक प्रतिस्पर्धी सज्ज आहेत. त्यात आपला घात होण्याची शक्यता असते. म्हणून प्रतिकूल परस्थितीत उत्तम निर्णय घेण्याची क्षमता असावी असे प्रतिपादन देवरीच उपविभागीय अधिकारी दुर्वेश सोनवाने यांनी केले. येथील केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळेत लोकमत लघु जाहिरात विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या स्वच्छ गाव, स्वच्छ शाळा या विषयावरील चित्रकला स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ््यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार ए.के.कदम होते. प्रमुख पाहुणे म्हणून लघु जाहिरात विभागाचे जिल्हा प्रतिनिधी राजीव फुंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश गेलानी, मुख्याध्यापक डी.टी.लाडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष टेकचंद बोपचे, मंडळ अधिकारी डी.एम.मेश्राम, तलाठी आर.एच.मेश्राम, सेवानिवृत्त वनपरिक्षेत्राधिकारी दहिवले, युवराज पटले, पुरूषोत्तम टेंभरे, दैवल मेंढे, पुष्पा खोब्रागडे, पुष्पा बहेकार, शामकला शेंडे, सुनिता पारधी उपस्थित होते. पुढे बोलताना त्यांनी, मेहनत, जिद्द, दिशा, पूर्ण नियोजन व व्यापक दृष्टीकोन या गुणांचा अंगीकार करून यशाचे शिखर गाठणे सोयीस्कर होते. तसेच आई-वडील आपल्या गरजा दूर सारून आपल्या पाल्यांच्या गरजा पूर्ण करतात. म्हणून त्यांनी पाहिलेले चांगल्या भविष्याचे स्वप्न पूर्ण करताना आपण बेईमानी करू नये असे मत मांडले. कदम यांनी, विद्यार्थ्याला संस्काराच्या चौकटीत राहून बिनधास्त जीवन जगण्याचा सल्ला दिला. तर स्वच:ला कधीही कमी लेखू नये, कारण प्रत्येकात आगळावेगळा गुण लपून असते. त्यावर प्रकाश टाकण्यासाठी शाळेपलीकडील ज्ञान आवश्यक असते असे सांगीतले. दरम्यान, चित्रकला स्पर्धेत माध्यमिक गटात प्रथम पवन जैपाल गिऱ्हेपुंजे, द्वितीय तृप्ती भिकराज चव्हाण, तृतीय सोहम झिंकटराव रहांगडाले तर प्राथमिक गटात प्रथम दामिनी भोजराज गिऱ्हेपुंजे, द्वितीय कोमल राजेश उके तर तृतीय क्रमांक सुनंगा गोपाल उके यांनी पटकाविला. तसेच प्रोत्साहन पुरस्कार दिक्षा फुंडे, योगेश्वरी कुकडीबुरे, प्राची फुंडे, मोहिनी कापसे, स्नेहा शेंडे, सागर बिसेन, प्राण वासनीक, जितेंद्र साठवणे, आचल भांडारकर, संगीता फुंडे, धारा रहांगडाले, साक्षी अशोक खोब्रागडे, रोहीत गिऱ्हेपुंजे, भागवत चौधरी यांनी पटकाविला असून त्यांना स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर केले. प्रास्तावीक येळे मांडले. संचालन बी.पी. चव्हाण यांनी केले. आभार वाय.आर. पटले यांनी मानले. कार्यक्रमासाठी एस.आर.चौधरी, बी.के. मेंढे, जे.व्ही.बुद्धेवार, एम.जी. कांबळे, जी.डी. भाकरे, सी.डी. तुरकर, एस.यु. पोचलवार, छाया तरोणे, ग्राम सचिव ओ.जी. बिसेन, रोशन बोहरे, संजय दोनेडे व आकृती बहुउद्देशीय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)