शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

ग्रामसेवक, सरपंचसह तिघांना लाचखोरी भोवली; असा लावला सापळा

By कपिल केकत | Updated: April 20, 2023 20:59 IST

बिल काढून देण्यासाठी मागणी : कुडवा येथील व्दारिका हॉटेलमध्ये लावला सापळा 

गोंदिया : रस्ता बांधकामासाठी टाकण्यात आलेल्या बांधकाम साहित्याचे बिल काढून देण्यासाठी ३५ हजार रूपयांची मागणी करून ती रक्कम स्वीकारणाऱ्या सरपंच पतीला लाच लुपचत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुरूवारी (दि.२०) केली असून  प्रकरणी सरपंचपतीसह सरपंच व ग्रावसेविकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रीती प्रशांत साखरे (३६,रा. चंद्रशेखर वॉर्ड, गोंदिया) असे ग्रामसेविका, अर्चना योगेश्वर कन्सरे (२८,रा. कोहका) असे सरपंच तर योगेश्वर भय्यालाल कन्सरे (३६,रा.कोहका) असे लाचखोर सरपंचपतीचे नाव आहे.

सविस्तर असे की, तक्रारदार हे बांधकाम मटेरियल सप्लायर असून त्यांनी गट ग्रामपंचायत सेजगाव खुर्द अंतर्गत प्राप्त टेंडर नुसार जन सुविधा योजने अंतर्गत सेजगाव स्मशानभूमी कडे जाणाऱ्या रस्त्याचा बांधकामाकरिता लागणारे २,७१,८५७ रुपयांचे साहित्य पुरविले आहे. पुरवठा केलेल्या बांधकाम साहित्याची बिले मंजूर करून त्यांना धनादेश दिल्याचा मोबदला म्हणून आरोपी ग्रामसेविका प्रीती साखरे यांनी १३००० रूपये तर सरपंच अर्चना  कन्सरे व त्यांचा पती योगेश्वर कन्सरे यांनी २२००० रुपयांची मागणी केली. यावर तक्रारादाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात  तक्रार नोंदविली. तक्रारीच्या आधारे पथकाने बुधवारी (दि.१९) पडताळणी केली असता ग्रामसेवक साखरे व सरपंच अर्चना कन्सरे यांनी ३५००० रुपये सरपंच योगेश्वर कन्सरे याच्याकडे देण्यास सांगीतले. 

यावर पथकाने गुरूवारी (दि.२०) लगतच्या ग्राम कुडवा येथील द्वारिका हॉटेलमध्ये सापळा लावला व  योगेश्वर कन्सरे याने पंचासमक्ष ३५००० रूपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. तिन्ही आरोपीतांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांचे विरुद्ध रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. ही कामगिरी पोलीस उप अधीक्षक पुरुषोत्तम अहेरकर, पो.नि. तुल तवाडे, स.फौ. विजय खोब्रागडे, चंद्रकांत करपे,

पो. हवा. संजय बोहरे, मंगेश काहलकर, नापोशी संतोष शेंडे, संतोष बोपचे, अशोक कापसे, संगीता पटले, रोहिणी डांगे व चालक दीपक बतबर्वे यांनी पार पाडली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसBribe Caseलाच प्रकरण