शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियात भीषण अपघात! शिवशाही बस उलटली, ११ जणांचा मृत्यू; मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 14:01 IST

गोंदियातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवशाही बस उलटून ११ जण ठार झाले आहेत .

गोंदिया : गोंदियातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवशाही बस उलटून ११ जण ठार झाले आहेत, तर अनेकजण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात आज दुपारी १ वाजताच्या सुमारास गोंदिया-कोहमारा मार्गावरील डव्वा जवळ घटना घडली. दरम्यान, या अपघातात मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

मिळालेली माहिती अशी, गोंदिया येथे बस उलटल्यानंतर आतापर्यंत ८ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांकडून अपघातग्रस्तांना तातडीने १० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा-गोंदिया ही शिवशाही बस शुक्रवारी (दि.२९) दुपारी भंडाऱ्याहून गोंदियाकडे येथे होती. बस चालकाने एका दुचाकीला ओव्हरटेक करताना डव्वा जवळ बस उलटून जवळपास २० फूट रस्त्यापासून घासत गेली. त्यामुळे बसमधील ११ प्रवाशांना मृत्यू झाला तर २९ प्रवासी जखमी झाले आहे. गंभीर जखमी असलेल्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने यात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. डव्वा येथील गावकऱ्यांनी अपघातस्थळी धाव घेत बसमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. तसेच १०८ रुग्णवाहिका बोलावून त्यांना गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची माहिती मिळताच डुग्गीपार पोलिस स्टेशनचे पोलिस घटनास्थळी दाखल होत मदत कार्याला सुरुवात केली आहे. जखमी व मृतक प्रवासी हे गोंदिया जिल्ह्यातीलच असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान भीषण अपघातामुळे गोंदिया-कोहमारा मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.

टॅग्स :Accidentअपघातgondiya-acगोंदिया