शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

दगडातून देव साकारणारा समाज उपेक्षित; हातातली कला भूक भागवण्यास असक्षम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 15:20 IST

Gondia : शासन योजनेचा लाभ नाही

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : मनगटाच्या जोरावर हातोडा अन् छन्नीच्या मदतीने दगडावर घाव घालून देव साकारणारा पाथरवट समाज स्वतंत्र भारतातही उपेक्षित जीवन जगत आहे. या समाजातील बहुतांश कारागीर हे नाममात्र साक्षर आहेत. मात्र, कोणत्याही विद्यापीठाची पदवी त्यांच्याकडे नाही. व्यावहारिकदृष्ट्या ते कोणत्याही नोकरीसाठी पात्र नसले तरी त्यांच्या हातात अंगभूत कौशल्य मात्र आहे. दगडाला आकार देऊन देव साकारण्याची कला त्यांना अवगत आहे. त्यांनी साकारलेल्या देवाची घरोघरी पूजा केली जाते. मात्र, तो देव साकारणाऱ्या हातांची मात्र उपेक्षा सुरू आहे. या कारागिरांच्या मूर्ती मूर्तिमंत कलेचा नमुना आहे. रानावनात धरणीमायच्या विशाल उदरात दडून बसलेल्या दगडाचा हे कारागीर शोध घेतात. आपल्या कलेद्वारे या दगडाचा देव करतात.

या कलाकारांच्या घामातूनच या देवांना पहिला अभिषेक घडतो. या कारागिरांनीच साकारलेले देव श्रीमंत मंदिरांमध्ये विराजमान आहेत. मात्र दगडाला देवपण देणाऱ्या या समाजाची दैना सुरू आहे. पवनसूत मारुतीरायासह नंदी, पिंड, शंकर यासह नानाविध मूर्ती हे कारागीर घडवितात. घराघरांतील स्वयंपाकघरात उपयोगी असलेली पारंपरिक जाते, पाटे, वरवंटे, खलबत्ता आदी वस्तूही हे कारागीर घडवतात. या वस्तूंच्या माध्यमातून नागरिकांच्या घरातील स्वयंपाक रुचकर बनतो. मात्र, या वस्तू घडविणाऱ्या कारागिरांना दोन वेळच्या जेवणासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. हा जीवघेणा प्रवास पिढ्यान् पिढ्या असाच सुरू आहे. आजच्या आधुनिक युगात प्रत्येक क्षेत्रात क्रांती झाली आहे. अवघे जग माणसाच्या मुठीत सामावले आहे. परंतु या कारागिरांच्या कलेला अजूनही पर्याय नाही. तरीही त्यांच्या कलेची मात्र किंमत केली जात नाही. आज या समाजाचा व्यवसाय संकटात सापडला आहे.

कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, हा प्रश्न निर्माण झाला आहे. दिवसभर राबराब राबून रक्त आटविणारे हे कारागीर इतरांच्या बंगल्याचा पाया मजबूत करतात. मात्र त्यांना स्वतःला राहण्यासाठी निवारा नाही. शासनाने या कष्टकरी उपेक्षित समाजाकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

स्थैर्याची गरज मूर्ती घडविणारे हे कारागीर सतत भटकंती करीत असतात. रोजगारासाठी गावोगावी भटकण्याविना त्यांच्याकडे दुसरा पर्यायही नाही. त्यामुळे त्यांची पुढची पिढीही शिक्षणापासून वंचित राहत आहे. या समाजाला स्थैर्य आवश्यक आहे. शासनासह सामाजिक जाणिवेच्या नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

 

टॅग्स :gondiya-acगोंदिया