शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

दोनच तालुक्यात 678 रुग्ण ॲक्टिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2022 05:00 IST

बाधित आढळणाऱ्या रुग्णांना कोराेना संसर्गाच्या अनुषंगाने सौम्य लक्षणे असल्याने ८५२ रुग्ण गृहविलगीकरणात असून केवळ ३५ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ४८,६००५ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यात २,५८,५१४ नमुन्यांची आरटीपीसीआर तर २,२७,४९१ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात ४२,४८१ नमुने कोरोना बाधित आढळले.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया आणि आमगाव तालुक्यात कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे दोनच तालुक्यात सर्वाधिक ६७८ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहे. त्यामुळे हे दोन्ही तालुके कोरोनाचे हाटस्पॉट झाले असून नागरिकांना अधिक सजग राहत कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने रविवारी (दि. १६) ९१९ चाचण्या करण्यात आल्या. यात ७२७ आरटीपीसीआर तर १९२ रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आल्या. यात १६० नमुने कोरोना बाधित आढळले. त्याचा पॉझटिव्हिटी रेट १७.३९ टक्के आहे. बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याचे पॉझिटिव्हिटी रेटसुद्धा वाढत असल्याचे चित्र आहे. १ ते १६ जानेवारीदरम्यान जिल्ह्यात तब्बल १,२८५ बाधितांची नोंद झाली आहे तर ३०० वर बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. बाधित आढळणाऱ्या रुग्णांना कोराेना संसर्गाच्या अनुषंगाने सौम्य लक्षणे असल्याने ८५२ रुग्ण गृहविलगीकरणात असून केवळ ३५ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ४८,६००५ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यात २,५८,५१४ नमुन्यांची आरटीपीसीआर तर २,२७,४९१ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात ४२,४८१ नमुने कोरोना बाधित आढळले. यापैकी ४०,७८७ बाधितांनी कोरोनावर मात केली असून सध्या स्थितीत ८८७ रुग्ण कोरोना ॲक्टिव्ह आहे. 

नियमांचे करा पालन - जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने पाय पसरत आहे. मात्र नागरिकांनी अद्यापही ही बाब गांर्भियाने घेतलेली नाही. त्यामुळे हा बिनधास्तपणा पुढे आपल्यालाच कडक निर्बंधाना सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्वांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे.  - कोरोना विरुध्दच्या लढ्यात मास्क, प्रतिबंधात्मक लस हेच महत्वपूर्ण शस्त्र आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्कचा नियमित वापर करावा. - जिल्ह्यात सध्या १५ ते १७ वयाेगटातील मुलांचे लसीकरण सुरु असून सर्वांनी आपल्या पाल्यांना लसीकरणासाठी न्यावे. - सर्वांनी स्वत:ची आणि आपल्या कुुटुंबियाची काळजी घ्यावी. 

 पॉझिटिव्हिटी रेट ८.८२ टक्के - मागील १६ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत १,२८५ भर पडली आहे. यामुळे पॉझिटिव्हिटी रेट सातत्याने वाढत आहे. सुरुवातीला १ ते २ टक्के असलेला पॉझिटिव्हिटी रेट आता ८.८२ टक्क्यावर पोहोचला आहे. त्यामुळे जिल्हावासीयांच्या चिंतेत थोडी भर पडली आहे. 

ओपीडी २४ बाय ७ सुरू ठेवा - कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. त्यामुळे चाचण्या करण्यासाठी येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मात्र रविवारी सर्व कोरोना चाचणी केंद्राची ओपीडी बंद राहत असल्याने चाचणीसाठी येणाऱ्यांना परत जावे लागते. त्यामुळे कोराेनाचा संसर्ग अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोरोना चाचण्यांची ओपीडी २४ बाय ७ सुरू ठेवण्याची मागणी केली जात आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या