शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

जिल्ह्यातील ६४५ मामा तलाव मृतावस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 21:39 IST

भविष्यातील पाणी टंचाई लक्षात घेता तत्कालीन गोंडराजाने गोंदिया जिल्ह्यात त्या काळी तयार केलेल्या मामा तलावांची देखभाल दुरूस्ती अभावी दुरवस्था झाली आहे. या तलावांची दुरूस्ती झाल्यास शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न वाढू शकते. असा अहवाल महाराष्ट्र शासनाला देण्यात आला.

ठळक मुद्दे५६३ मामा तलावांना संजीवनी : ३९७ तलावांच्या दुरूस्तीसाठी २७ रुपयांची कोटी गरज

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भविष्यातील पाणी टंचाई लक्षात घेता तत्कालीन गोंडराजाने गोंदिया जिल्ह्यात त्या काळी तयार केलेल्या मामा तलावांची देखभाल दुरूस्ती अभावी दुरवस्था झाली आहे. या तलावांची दुरूस्ती झाल्यास शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न वाढू शकते. असा अहवाल महाराष्ट्र शासनाला देण्यात आला.या मामा तलावांचे पुनरूज्जीवन करण्यासाठी तीन वर्षात जिल्ह्यातील ११८८ मामा तलावांची दुरूस्ती करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यापैकी ५६३ तलावांच्या पुनरूज्जीवनाचे काम केले. परंतु ६४५ मामा तलाव आजही मृतावस्थेत आहेत.सन २०१६-१७ व २०१७-१८ या दोन वर्षात ५६२ तलावांचे काम हाती घेण्यात आले. त्यातील ५४२ तलावांचे काम पूर्ण करण्यात आले. त्यामुळे ६ हजार १७२ हेक्टर शेतीचे सिंचन होत असल्याचे लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.गोंदिया जिल्ह्यातील १४२१ मामा तलावांपैकी ११८८ मामा तलाव नादुरूस्त असल्यामुळे या तलावांची सर्वकष दुरूस्ती करण्यासाठी तीन वर्षात विशेष दुरूस्ती करण्याचा उपक्रम शासनाने सुरू केला. यासाठी सन २०१६-१७ या वर्षात ४१७ तलाव निवडण्यात आले. सन २०१७-१८ या वर्षात १४५ तलाव निवडण्यात आले. परंतु ५६३ मामा तलावांचे अंदाजपत्रक तयार करून तांत्रीक व प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. त्या सर्व मामा तलावांचे काम करण्यासाठी कार्यारंभ आदेश देण्यात आले. यापैकी ५५२ तलावांचे काम सुरू करण्यात आले असून ५४२ तलावांची कामे पूर्ण झाली आहेत. यासाठी २८ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. यातून ६ हजार १७२ हेक्टर शेतीला सिंचन होईल एवढा पाणीसाठी त्या तलावांमध्ये जमा झाला असल्याचे लघु पाटबंधारे विभाग सांगत आहे.१९६० नंतर शासनाने ताब्यात घेतलेल्या या मामा तलावांची झालेली दुरवस्था आता सुधारण्यासाठी शासनाने पुनरूज्जीवन कार्यक्रम सुरू केला आहे. सन २०१८-१९ या वर्षात ३९७ तलाव निवडण्यात आले. यासाठी २७ कोटी रुपयांची गरज असल्याचे सांगण्यात येते.जिल्ह्यातील मामा तलावांच्या दुरूस्तीसाठी शासनाने २६ कोटी रूपये जिल्ह्याला दिले आहेत. या पुनरूज्जीवीत झालेल्या तलावामुळे शेती सिंचीत होईल.त्यामुळे शेतकºयांचे उत्पन्न वाढविण्यास मदत होईल.११८८ तलावांच्या दुरूस्तीचे उद्दिष्टजिल्ह्यातील ११८८ माल गुजारी तालवांची दुरूस्ती झाल्यास हजारो हेक्टर शेत जमिनीला सिंचनाची सुविधा होईल. यामुळे मत्स्य पालनाला वाव मिळेल, पीक क्षेत्र वाढणार आहे. दुरूस्तीपूर्वी ६३७५ हेक्टर क्षेत्रात पीक घेतले जात होते. आता हजारो हेक्टर पीकक्षेत्र वाढले आहे. मत्स्यव्यवसायात रोजगार उपलब्ध होऊन दरडोई उत्पन्न वाढेल. लोकसहभाग वाढेल, परिणामी तलावांना जलवैभव प्राप्त होईल. तलावांसाठी निस्तार हक्क धारक पाणी वापर संस्था स्थापन होतील.भग्नावस्थेत असलेल्या मामा तलावात पाण्याचा ठणठणाट होता. परंतु शासनाने मामा तलावांचे पुनरूज्जीवन कार्यक्रम हाती घेतला. त्यामुळे तलावांची सर्वकष दुरूस्ती झाली.त्यामुळे सिंचन क्षमता वाढेल व त्यांच्या उत्पन्नात निश्चीतच वाढ होईल.- संजय विश्वकर्माकार्यकारी अभियंता ल.पा.विभाग जि.प.गोंदिया.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई