शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिक ठार; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
4
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
5
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
6
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
7
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
8
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
9
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
10
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
11
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
12
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
13
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
14
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
15
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
16
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
17
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
18
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
19
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
20
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?

२९.२२ लाखांच्या तंबाखूसह ६०.२२ किमतीचा माल जप्त; एफडीएसह नवेगावबांध पोलिसांची केली संयुक्त कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 16:28 IST

Gondia : नवेगावबांध पोलिसांनी अन्न व औषधी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह संयुक्त कारवाई करून तंबाखू व तंबाखूजन्य पान मसाला केला जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या व मानवी जीवितास हानिकारक असलेली तंबाखू व तंबाखूजन्य गुटखा, पानमसाला गोंदिया जिल्ह्यात येत असताना नवेगावबांध पोलिसांनी अन्न व औषधी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह संयुक्त कारवाई करून २९ लाख २२ हजार ५६० रुपयांची सुगंधी तंबाखू व तंबाखूजन्य पान मसाला जप्त केला. पहिली कारवाई शुक्रवारी (दि.२), तर दुसरी कारवाई शनिवारी (दि.३) करण्यात आली. या दोन कारवायांत ६० लाख २२ हजार ५६० रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून, दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहिल्या कारवाईत, छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव जिल्ह्यातील सालिक झिटिया (डोंगरगड) येथील आरोपी भूपेंद्र मोतीराम शाहू (४३) हा शुक्रवारी (दि.२) रात्री ११ वाजता डोंगरगडकडून वाहन क्रमांक एमएच ४०-सीटी ०७२५ या वाहनात तंबाखू व तंबाखूजन्य पान मसाला टाकून नवेगावबांध येथील माहेश्वरी राइस मीलसमोर येताच त्याला पोलिस व एफडीएच्या पथकाने पकडले, तर दुसऱ्या कारवाईत ट्रक क्रमांक सीजी ०७-सीक्यू ४६०२ या वाहनात तंबाखू व तंबाखूजन्य पानमसाला टाकून वाहतूक करीत असताना आरोपी मोहम्मद असमोहम्मद मुख्तार (४८), रा. इस्लामनगर सुपेला भिलाई, ता. जि. दुर्ग (छत्तीसगड) याला नवेगाव ते देवलगाव रोड नवेगावबांध ते अर्जुनी मोरगाव मार्गावर शनिवारी (दि.३) दुपारी २ वाजता पकडण्यात आले. या दोन्ही प्रकरणातील आरोपींवर अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ चे कलम २६ (२) (आय), २६ (२) (आयव्ही), २७ (३) (ई), ३ (१) (झेड झेड) (व्ही), ५९ सहकलम २२३, २७४, २७५, १२३ भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई नागपूरचे सहआयुक्त (अन्न) के. आर. जयपूरकर, सहायक आयुक्त एस.पी. शिंदे यांच्या मार्गदर्शनात अन्न सुरक्षा अधिकारी एम.पी. चहांदे, पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनात महिला पोलिस निरीक्षक योगीता चाफले, सहायक फौजदार अनंत तुलावी, पोलिस हवालदार उदयभान इंदूरकर, विलास वाघाये, राहुल पवार आदींनी केली आहे.

पहिल्या कारवाईत ५८ पोती तंबाखू जप्तपहिल्या कारवाईत २९ पोती सुगंधी तंबाखू व २९ पोती पानमसाला असा ५८ पोती तंबाखू व तंबाखूजन्य साठा जप्त करण्यात आला. या २९ पोत्यांत सहा चुंगळ्ळ्यांमध्ये ९० ग्रॅम वजनाचे प्रत्येकी किमत १२० रुपये असलेले ९०४८ पाकीट एकूण वजन ८१४.३२ किलो ग्रॅम किंमत १० लाख ८५ हजार ७६० रुपये व सुगंधित तंबाखू (एम- ४) च्या २९ पोत्यांमध्ये प्रत्येकी सहा चुंगळ्ळ्या ९ ग्रॅम वजनाच्या प्रत्येकी किंमत ३० रुपये, असे ९०४८ पाकिटे एकूण वजन ८१. ४३२ किलो ग्रॅम, ज्याची किंमत दोन लाख ७१ हजार ४४० रुपये सांगितली जाते. अशाप्रकारे एकूण ८९५.७५२ किलोग्रॅम तंबाखूजन्य पदार्थ, त्याची किंमत १३ लाख ५७ हजार २०० रुपये व वाहन क्रमांक एमएच ४०- सीटी ०७२५ किमत १५ लाख रुपये, असा एकूण २८ लाख ७० हजार २०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

दुसऱ्या कारवाईत १६ लाखांचा माल जप्त नवेगावबांध ते अर्जुनी-मोरगाव मार्गावर करण्यात आलेल्या दुसया कारवाईत सुगंधित तंबाखू पान मसाल्याचे एकूण ६४७.६ किलो ग्रॅम वजनाचे साहित्य जप्त करण्यात आले. त्यांची किमत १५ लाख ६५ हजार ३६० रुपये, तर ट्रक क्रमांक सीजी ०७-सीक्यू ४६०२ ची किंमत १६ लाख, असा एकूण ३१ लाख सहा हजार ३६० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. 

टॅग्स :Tobacco Banतंबाखू बंदीgondiya-acगोंदिया