लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गेल्या वर्षी पावसाळ्यात जिल्ह्यात सरासरी ११४ टक्के पाऊस झाला. परिणामी जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा होता. सिंचनानंतर, खरीप पिकांचा साठा ७३.४० टक्के पाणीसाठा शिल्लक होता. रब्बी पिकांच्या सिंचनासाठी विविध प्रकल्पांमधून पाणी सोडले जात आहे. त्यामुळे सध्या स्थितीत सिंचन प्रकल्पात ५६.८९ टक्के जलसाठा आहे.
तलावांचा जिल्हा म्हणून गोंदिया जिल्हा ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये यावर्षी पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडला. जून ते सप्टेंबर सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. जिल्ह्यात ११ टक्क्यांनी जलसाठ्याची वाढ झाली. त्यामुळे जिल्ह्यातील लघु पाटबंधारे विभागाच्या मध्यम, लघु आणि मामा तलावांपैकी ९८ तलाव भरले आहेत. या प्रकल्पांमधून खरीप आणि रब्बी पिकांना सिंचन दिल्यानंतर, तिन्ही प्रकारच्या प्रकल्पांमध्ये सध्याची स्थिती ५६.८९ टक्के आहे. गेल्या वर्षी याच तारखेला या प्रकल्पांमध्ये फक्त ५४.३५ टक्के पाणीसाठा होता.
जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पातील पाणीसाठाप्रकल्प टक्केवारीबोदलकसा ७९.२४ टक्केचोरखमारा ८१.२४ टक्केचुलबंद ५१.९५ टक्केखैरबंधा ३८.२१ टक्केमानागड ७४.३८ टक्केरेंगेपार ५७.९८ टक्केसंग्रामपूर ५५.२० टक्केकटंगी ५१.६० टक्के
रब्बी पिकांना सिंचनसध्या ५५.५३ टक्के साठा हा २३ लहान प्रकल्पांमध्ये आहे. गेल्या वर्षी याच तारखेला ते ५१.१० टक्के पाण्याचा साठा होता. ३८ मामा तलावांचा विचार करता या तलावांमध्ये ३९.५५ टक्के पाणीसाठा आहे. लघु पाटबंधारे विभागाच्या वरील तीन प्रकारच्या ७० प्रकल्पांमध्ये एकूण साठवण क्षमता ११७.९३३ दशलक्ष घनमीटर आहे. त्याची टक्केवारी ५६.८९ आहे. या प्रकल्पांद्वारे रब्बी पिकांना सिंचन केले जात आहे.
गेल्या वर्षी तालुकानिहाय पडलेला पाऊसतालुका पडलेला पाऊसगोंदिया १०८.६ मिमीआमगाव ८५.८० मिमीतिरोडा ९५.८० मिमीगोरेगाव १३०.७ मिमीसालेकसा १०८.१ मिमीदेवरी १२५.९ मिमीअर्जुनी मोरगाव १२०.८ मिमीसडक अर्जुनी १०१.८ मिमीएकूण ११४.३ मिमी