शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती चितपट होणार? निकालाची उत्सुकता शिगेला
3
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
4
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
5
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
6
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
7
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
8
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
9
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
10
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
11
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
12
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
13
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
14
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
15
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
17
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
18
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
19
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
20
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?

जिल्ह्यातील ४२ विहिरी कोरड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2017 02:03 IST

दुष्काळावर मात करण्यासाठी व शेतकऱ्यांना सिंचनाची सोय करता यावी यासाठी जलयुक्त शिवार अभियान सुरू करण्यात आले.

 ९६१ विहिरींचे काम पूर्ण : २ हजार पैकी १५२५ विहिरींचे काम सुरू लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : दुष्काळावर मात करण्यासाठी व शेतकऱ्यांना सिंचनाची सोय करता यावी यासाठी जलयुक्त शिवार अभियान सुरू करण्यात आले. या अभियानांतर्गत शेततळी तयार केल्या जात आहेत. ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना सुरू करण्यात आली. तरीही भूगर्भातील पाणी वाढत नसल्याचे पाहून सिंचनासाठी सिंचन विहीर देण्याची योजना सुरू केली. परंतु त्या विहीरींनाही पाणी लागत नाही. जिल्ह्यात ९६१ विहीरींपैकी ४२ विहीरींना पाणी लागले नाही. यामुळे शासनाचे कोट्यवधी रूपये पाण्यात गेले आहे. राज्य सरकार द्वारे सिंचन विहीरी शेतकऱ्यांसाठी वरदान असल्याचे समजले जाते. सन २०१६-१७ मध्ये विदर्भातील ११ हजार शेतकऱ्यांना सिंचन विहीरी देण्याचे उद्दीष्ट ठेवले होते. यात गोंदिया जिल्ह्यात २ हजार विहीरींचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते व १ हजार ५२५ विहीरींचे कार्यारंभ आदेश देण्यात आले. जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यात २७५ पैकी २३९, गोंदियात २०० पैकी १६७, तिरोडा २७५ पैकी २३१, आमगाव १५० पैकी ११९, सडक-अर्जुनीत २५० पैकी १४५, देवरीत ३०० पैकी २००, अर्जुनी-मोरगाव ३०० पैकी २५४ व सालेकसात २५० पैकी १७० विहीरींचा समावेश आहे. तर काम सुरू झालेल्या विहीरींची संख्या गोरेगाव २२४, गोंदिया १४०, तिरोडा १८१, आमगाव ३५, सडक-अर्जुनी ६१, देवरी ६२, अर्जुनी मोरगाव १६२ व सालेकसाच्या ५४ विहीरींना भरपूर पाणी लागले आहे. विहीरींमध्ये बोअरवेल बसविण्यात आलेल्या विहीरींची संख्याही बरीच आहे. गोरेगाव ६०, गोंदिया ७४, तिरोडा १५, आमगाव २०, सडक-अर्जुनी २४, देवरी १८, अर्जुनी-मोरगाव ४६ व सालेकसात ५२ सिंचन विहीरींवर बोअरवेल तयार करण्यात आले. अर्जुनी-मोरगावच्या ३ विहीरींचे काम अयशस्वी झाले. १६ कोटी रुपये खर्च सिंचन विहीरीसाठी राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाला २२ कोटी ५० लाख रूपये दिले आहेत. यातील १५ कोटी ७९ लाख ८४ हजार रूपये खर्च करण्यात आले. आता ६ कोटी ७० लाख १६ हजार रूपये पंचायत समित्यांकडे शिल्लक आहेत. गोरेगाव पंचायत समितीने ४ कोटी ५ लाखापैकी दोन कोटी ४४ लाख ३६ हजार, गोंदिया २ कोटी ९५ लाखापैकी १ कोटी ३९ लाख ९८ हजार, तिरोडा २ कोटी ५२ लाख ५० हजारापैकी २ कोटी ६ लाख ८७ हजार, आमगाव एक कोटी ६५ लाखापैकी ९२ लाख ७३ हजार, सडक-अर्जुनी २ कोटी १२ लाख ५० हजारापैकी एक कोटी ५७ लाख ६० हजार, देवरी दोन कोटी ८० लाखापैकी २ कोटी ५५ लाख २ हजार, अर्जुनी-मोरगाव ४ कोटी ३७ लाख ५० हजार पैकी ३ कोटी ६४ लाख ७८ हजार व सालेकसा तालुक्यात २ कोटी २ लाख ५० हजारापैकी एक कोटी १८ लाख ५० हजार रूपये खर्च करण्यात आले आहेत.