शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

‘तिबेट बचाव’साठी चार हजार किमीचा सायकल प्रवास

By admin | Updated: January 24, 2015 01:20 IST

तब्बल ४४ दिवस, पाच राज्ये आणि ४ हजार किमीचा प्रवास करून विश्वशांतीचा संदेश देणारे शांतीदूतांचे शुक्रवारी अर्जुनी-मोरगावच्या तिबेट वसाहतीत आगमन झाले.

अर्जुनी-मोरगाव : तब्बल ४४ दिवस, पाच राज्ये आणि ४ हजार किमीचा प्रवास करून विश्वशांतीचा संदेश देणारे शांतीदूतांचे शुक्रवारी अर्जुनी-मोरगावच्या तिबेट वसाहतीत आगमन झाले. या चमूचे साई मंदिरात विविध संघटनातर्फे स्वागत करण्यात आले. जागतिक मानवाधिकार दिवस तसेच विश्व शांतीदूत दलाई लामा यांच्या नोबल शांती पुरस्कार रजत महोत्सव वर्ष निमित्ताने भारत-तिबेट मैत्री संघ नागपूरच्या वतीने ‘तिबेट बचाव सायकल यात्रा’ काढली होती. या यात्रेचा नार्गेलिंग तिबेट वसाहत गोठणगाव येथे शुक्रवारी समारोप झाला. तिबेटमध्ये शांतीदूत दलाई लामा यांचे परत जाणे हा तिबेट लढ्यासाठी संघर्ष करणाऱ्या शहिदांचा मुख्य उद्देश होता. तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी या माध्यमातून चीनवर दबाव निर्माण करावा, चीनच्या विविध कारागृहात यातना भोगणारे ११ वे पंचम लामा गोदून छोक्की निम्मा, टिल्कू तेन्झिन डेलके व इतर कैद्यांना तातडीने सुटका करावी, तिबेटची वास्तविकता जाणून घेण्यासाठी स्वतंत्ररित्या आंतरराष्ट्रीय पत्रकार तसेच इतर आंतरराष्ट्रीय युवक संघटनांचे प्रतिनिधी मंडळ पाठविणे, चीनने तिबेटमध्ये होत असलेल्या मानवाधिकाराच्या उल्लंघनावर प्रतिबंध घालणे, भारत-तिबेट सीमा तसेच संपूर्ण पूर्व-उत्तर सीमांवर परमाणू प्रक्षेपणास्त्राच्या वाढत्या हस्तक्षेपांवर बंदी घालणे, चिनने ताब्यात घेतलेली भारताची ४० हजार वर्ग मिल जमीन परत करावी, तसेच भारतातील अरूणाचल प्रदेश व सिक्कीम राज्यावर चीनच्या दावेदारीला गांभीर्याने घ्यावे, कैलास मानसरोवरला चीन सेनेच्या कब्ज्यातून मुक्त करावे, तसेच दलाई लामा यांना भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करावे हा या सायकल भ्रमण प्रवासाचा मुख्य उद्देश आहे. या सर्व बाबींना लक्षात घेऊन भारत सरकारने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करून चीनच्या विस्तारवादी व दबावतंत्राचा तिबेटीयनांनी निषेध व्यक्त केला. या दलाचे साई मंदीर येथे अशोक चांडक, मुकेश जायस्वाल, अशोक काळबांधे, शालीकराम हातझाडे, परसराम शेंडे, नविन नशिने, राजू पालीवाल, सुनिल लंजे व प्रशांत अवचटे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी संदेश मेश्राम, कालसंग छोडक, ओर्गेन नॉर्बू, तेन्जिन थोरडो, त्सेवांग, दोरजी ठोकरे, तेन्जी त्सोग्याल, वॉगचेन, सामतेन लोपसांग, तेन्जिन कुंगा, लोपसांग दावा, चिमे रिनझीन, तेन्जीन ल्हाग्याल, फुन्त्सोक तोशी, दोरजी सरपंच, त्सेवांग वांगमो, तेन्जीन यान्डोन, न्गोडूप ल्हामो, तेन्जीन चीमे, तेन्जीन टिन्पो, फुन्त्सोक टोपस्याल, त्सेवांग वांगचूक, तेन्जिन नान्ग्याल और तेन्जीन जिन्पा उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)