शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast : शू बॉम्बर, रॉकेट, ड्रोन... दिल्ली स्फोटातील उमरने हमाससारख्या भयंकर हल्ल्याचा रचलेला कट?
2
धक्कादायक! धावत्या अँम्बुलन्सला भीषण आग, नवजात बालकासह चार जणांचा होरपळून मृत्यू
3
"साहेबांसाठी काहीतरी करा"; वॉशरूममध्ये लाच मागितली, पैसे मिळताच WhatsApp कॉल केला अन् अडकले न्यायमूर्ती
4
बिहार निकालावरील चर्चेमुळे गेला जीव, २२ वर्षीय भाच्याचा दोन मामांनीच काढला काटा
5
गर्भात जुळ्या मुलांचा मृत्यू, उपचारादरम्यान आईचा गेला जीव; दुःखी झालेल्या पतीने स्वत:ला संपवलं
6
सुमार मराठीवरून झाल्या ट्रोल, भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या 'त्या' महिला उमेदवार कोण? व्हिडीओ होतोय व्हायरल
7
Delhi Car Blast: अल-फलाह विद्यापीठाविरुद्ध EDची कारवाई, ओखला-जामिया नगरसह २५ ठिकाणी छापे
8
भर कॉन्सर्टमध्ये पाकिस्तानी सिंगरने फडकावला भारताचा झेंडा, ट्रोलिंग झाल्यावर म्हणतो- "मी हे पुन्हा करेन, कारण..."
9
"त्याने माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि...", गिरिजा ओकला आलेला लोकल ट्रेनमध्ये धक्कादायक अनुभव
10
रांगेत उभे राहू नका! पोस्ट ऑफिसमध्ये जा आणि कागदपत्रांशिवाय मिनिटांत नंबर अपडेट करा
11
दत्त जयंती २०२५: गुरुचरित्र वाचण्यावर स्त्रियांना बंदी का? सद्गुरू टेंबे स्वामींनी दिले आहे स्पष्टीकरण!
12
Mumbai: अनैतिक संबंधातून बाळाचा जन्म, डॉक्टरांकडून ५ लाखांत विकण्याचा प्रयत्न, ५ जणांवर गुन्हा दाखल
13
दोन PAN Card ठेवल्यास ₹१०,००० दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा; 'या' सोप्या पद्धतीने सरेंडर करा दुसरे कार्ड!
14
नवी मुंबईत शिवरायांचा पुतळा पुन्हा झाकला; नुकतेच अमित ठाकरेंनी आंदोलन करत केले होते अनावरण
15
श्रीमंतीचा दिखावा, ६ गर्लफ्रेंड पटवल्या, कायम जंगलात राहायचा; अखेर पोलिसांनी 'त्याला' अटक केली
16
शेअर बाजारातील 'जॅकपॉट' स्टॉक्स : १० महिन्यांत ₹१०००० चे झाले ₹५ लाख; पैशांचा वर्षाव करताहेत ‘हे’ ४ स्टॅाक
17
श्रीकांत शिंदे यांना भाजपाचा मोठा धक्का; कल्याण डोंबिवलीत शिंदेसेनेच्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
18
Mumbai: मुंबईत कांदा स्वस्त होणार की महागणार? पावसामुळे मोठे नुकसान; उत्पादनाचा अंदाज येईना
19
धक्कादायक! ३४ वर्षांच्या प्रसिद्ध गायकाचं निधन, समोर आलं हादरवून सोडणारं कारण
20
Mumbai: शाळेच्या कॅन्टीनमधील समोसा खाल्ल्याने २० विद्यार्थ्यांना विषबाधा, तेलात कापूर पडल्याची माहिती
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील 327 मामा तलाव गेले चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2022 05:00 IST

गोंदिया जिल्ह्यात मामा तलावांची संख्या जि. प. लघु पाटबंधारे विभागाच्या रेकॉर्डनुसार आधी १७४८ होती. आता त्याच रेकार्डनुसार जिल्ह्यात मामा तलावांची संख्या १४२१ आहे. म्हणजेच ३२७ मामा तलाव चोरीला गेले आहेत. ज्या लोकांच्या शेतात हे तलाव होते. त्यांनी त्या तलावांचे सपाटीकरण करून तलावांची जागा शेती घेतली आहे. यातील ११७ मामा तलावांची दैनावस्था आहे.

नरेश रहिलेलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता सिंचनाची सोय नसल्यामुळे त्यांना निसर्गावरच अवलंबून रहावे लागते. भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेता गोंडराजाने जिल्ह्यात त्या काळी तयार केलेल्या मामा तलावांची दुरवस्था झाली आहे. मामा तलाव, लपा तलाव, पाझर तलाव, कोल्हापुरी बंधारे, साठवण बंधारे व उपसा सिंचनांची दुरवस्था असल्यामुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्रातील सिंचन अडले आहे. जिल्ह्यातील ३२७ माल गुजारी तलाव चोरीला गेल्याचे चित्र आहे. गोंदिया जिल्ह्यात मामा तलावांची संख्या जि. प. लघु पाटबंधारे विभागाच्या रेकॉर्डनुसार आधी १७४८ होती. आता त्याच रेकार्डनुसार जिल्ह्यात मामा तलावांची संख्या १४२१ आहे. म्हणजेच ३२७ मामा तलाव चोरीला गेले आहेत. ज्या लोकांच्या शेतात हे तलाव होते. त्यांनी त्या तलावांचे सपाटीकरण करून तलावांची जागा शेती घेतली आहे. यातील ११७ मामा तलावांची दैनावस्था आहे. जिल्ह्यातील सद्यस्थितीत असलेल्या १४२१ मामा तलावांमधून जिल्ह्यातील २८ हजार ७३० हेक्टर क्षेत्राला सिंचन होऊ शकते. मात्र यातील ११७ तलाव नादुरुस्त आहेत. या नादुरुस्त मामा तलावांच्या दुरुस्तीसाठी १७ कोटी ९६ लाख ४१ हजार रुपयांची गरज असल्याचे लघुपाटबंधारे विभागाचे म्हणणे आहे. जिल्ह्यातील मामा तलाव हे शेती सिंचनासाठी अत्यंत उपयोगी पडणारे होते. परंतु शेतीची जागा अकृषक करून त्यावर प्लाटींग तयार करण्यात येत आहे. तलावांचे सपाटीकरण करून तलावांची जागा शेती घेऊन लागली आहे. त्यामुळे तलावांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. तलावांचे सपाटीकरण करता येत नाही. परंतु जे तलाव बुजविण्यात आले त्याला जबाबदार कोण? याकडे प्रशासन लक्ष का घालत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. जिल्ह्यातील ३२७ मामा तलाव गायब होऊनही एकावरही कारवाई नाही हा चिंतनाचा विषय आहे.

लघु पाटबंधारे विभागाला हवीत केवळ नवीन कामे- मामा तलावांमधून योग्य सिंचन क्षमता होते किंवा नाही. लघु पाटबंधारे विभागामार्फत असलेले सर्व प्रकल्पांच्या देखरेखीचे काम त्या विभागाचे आहे. परंतु लघु पाटबंधारे विभागाला नवीन काम करण्यासाठी निधी असला तरच ते काम करतात. अन्यथा आपल्या मालकीचे तलाव कुठे गायब होतात याकडे त्यांचे लक्ष नाही.

मामा तलावांची दुरुस्ती जि.प.कडे; परंतु हस्तांतरित केलेच नाही- स्वातंत्रपूर्व काळात तयार करण्यात आलेल्या मालगुजारी तलावांची दुरुस्ती करण्याचे अधिकारी शासनाने जिल्हा परिषदेकडे दिले आहे. १०० हेक्टरातील प्रकल्पाचे काम जि.प.कडे देण्यात आले. परंतु स्वातंत्र्यानंतर या मामा तलावांच्या सातबाऱ्यावर सरकार असेच नमूद आहे. ते तलाव जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित झाले नाही.महसूल विभागाची केवळ बघ्याची भुमिका - कोणत्या तालुक्यातील किती मामा तलावांचे सपाटीकरण झाले. कोणत्या तलावात शेती तयार झाली. कोणत्या तलावाचे प्लाटिंग झाले, त्यात घरे तयार झालीत, याची शहनिशा महसूल विभागाने करणे आवश्यक आहे. ना ग्रामपंचायत, ना महसूल विभाग या तलावांकडे लक्ष देत असल्यामुळे ही मामा तलावांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. मागील सात ते आठ वर्षात तलावांची संख्या कमी होत असताना याबाबत महसूल व पाटबंधारे विभागाने कुठलीही दखल घेतली नाही. 

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प