शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

९० क्विंटल तांदळाचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 22:22 IST

तालुक्यातील आंबेतलाव येथे बुधवारी (दि.२४) नेवालाल पटले यांच्या घरात पोषण आहार पुरवठा योजनेचा अवैध १८० कट्टे (प्रती कट्टा ५० किलो) तांदळाचा साठा असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली.त्यानंतर गोरेगाव पोलीस, तहसीलदार यांच्यासह आंबेतलाव येथे रात्री १० वाजता धाड टाकली.

ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। जप्त केलेला तांदूळ शासकीय गोदामात जमा

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : तालुक्यातील आंबेतलाव येथे बुधवारी (दि.२४) नेवालाल पटले यांच्या घरात पोषण आहार पुरवठा योजनेचा अवैध १८० कट्टे (प्रती कट्टा ५० किलो) तांदळाचा साठा असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली.त्यानंतर गोरेगाव पोलीस, तहसीलदार यांच्यासह आंबेतलाव येथे रात्री १० वाजता धाड टाकली.नेवालाल पटले यांच्या घरात १८० कट्टे तांदळाचा अवैध साठा आढळला. तहसीलदार शेखर पुनसे यांनी पंचासमक्ष पंचनामा करुन गुरुवारी वजन करुन तांदूळ जप्त केला. सदर तांदूळ प्रशासकीय गोदाम गोरेगाव येथे ठेवण्यात आला.तहसीलदार पुनसे यांनी दिलेल्या माहितीनुसार आंबेतलाव येथे बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक रमेश गरजे यांच्या पथकाने नेवालाल पटले यांच्या घरी धाड टाकली. यात अवैध तांदळाचे १८० कट्टे अंदाजे ९० क्विंटल तांदूळ आढळला.या संदर्भात नेवालाल पटले यांना विचारपूस केली असता मोहाडी या गावचा विलास बघेले यांनी हा तांदूळ आणून ठेवला असल्याचे पोलिसांना सांगितले. हा तांदूळ पोत्यावरील अंकित मार्कानुसार शासकीय असावा, असा तर्क लावून याची माहिती तहसीदलार पुनसे यांना दिली.तहसीलदार पुनसे यांनी या धान्याची शहानिशा करुन पंचनामा केला व गुरुवारी धान्याच्या वजनाचा काटा करुन शासकीय गोदामात १८० कट्टे ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले. विलास बघेले हा इसम गोरेगाव तालुक्यातील मोहाडी या गावचा रहिवासी आहे. आमगाव तालुक्यात पोषण आहार पुरवठाधारकाजवळ काम करीत असून शाळेत पोषण आहार पुरवठा करीत असतो. तसेच या कट्टयावर असलेले मार्क श्री अशोका राईस ट्रेडर्स हिंद एफ.जी.एस. (पी.बी.) लिहिले आहे. त्यामुळे हे धान्य अवैध असल्याचे बोलले जाते. गोरेगाव तहसीलदार शेखर पुनसे यांनी लवकरच मोहाडी निवासी विलेश बघेले यांना बोलावून या संदर्भात माहिती घेवून योग्य कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदार शेखर पुनसे यांनी सांगितले.