शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

मागील वर्षी आढळले जिल्ह्यात हत्तीरोगाचे २५२५ रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 12:40 AM

हत्तीरोग हा एक अत्यंत त्रासदायक आजार आहे. या आजाराने रूग्ण दगावत नसला तरी त्याला अत्याधिक शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. हा आजार बरा होत नसल्याने रूग्णांची त्यातून सुटका होत नाही. गोंदिया जिल्ह्यात १६ ते ३१ आॅगस्ट २०१८ पर्यंत हत्तीरोग व अंडवृध्दी रूग्ण शोध मोहीम राबविण्यात आली होती.

ठळक मुद्देजनजागृतीमुळे रूग्णांच्या संख्येत घट: हत्तीरोग नियंत्रण मोहीम २५ पासून

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : हत्तीरोग हा एक अत्यंत त्रासदायक आजार आहे. या आजाराने रूग्ण दगावत नसला तरी त्याला अत्याधिक शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. हा आजार बरा होत नसल्याने रूग्णांची त्यातून सुटका होत नाही. गोंदिया जिल्ह्यात १६ ते ३१ आॅगस्ट २०१८ पर्यंत हत्तीरोग व अंडवृध्दी रूग्ण शोध मोहीम राबविण्यात आली होती. या शोध मोहिमेत गोंदिया जिल्ह्यात २५२५ हत्तीरोगाचे रूग्ण आढळून आले.हत्तीरोग हा आजार विद्रूप आणि शारीरिक विकृती घेऊन जगतांना त्यांच्या मनात शरमेची भावना निर्माण होते. अंडवृध्दीमध्ये पुरूषांच्या वैवाहीक जिवनात अडथळा निर्माण होऊ शकतो. हत्तीरोगामुळे विद्रुपता व अपंगत्व येते. हत्तीरोग हा आजार वुचूरेरीया बॅक्रोप्टी या परोपजीवी जंतूमुळे होतो. या जंतूचा प्रसार क्युलेक्स जातीच्या मादी डास चावल्याने होतो. जगभरातील हत्तीरोगाचे ४० टक्के रूग्ण हे भारतात आढळतात. या आजाराचे रूग्ण महाराष्टÑात सर्वाधिक आहेत. सन २०१८ या वर्षात आॅगस्ट महिन्यात राबविण्यात आलेल्या शोध मोहीमेत हत्तीरोगाचे २५२५ रूग्ण आढळले. यात गोंदिया तालुक्यात ४९७, तिरोडा ३५६, गोरेगाव ३०७, आमगाव १४२, देवरी १७२, सालेकसा ७५, अर्जुनी-मोरगाव ६१८ व सडक-अर्जुनी ३५८ रूग्ण आढळले. गोंदिया जिल्ह्याच्या ग्रामीण भागात २५ ते २७ फेब्रुवारी तर शहरी भागात २५ फेब्रुवारी ते १ मार्च या दरम्यान हत्तीरोग नियंत्रण मोहीम राबविण्यात येत आहे. सन २०१६ मध्ये गोंदिया तालुक्यात ६४६, तिरोडा ५३५, गोरेगाव ३६६, आमगाव २१२, देवरी २३३, सालेकसा १३७, अर्जुनी-मोरगाव ७०२ व सडक-अर्जुनी ३९६ रूग्ण आढळले आहेत. सन २०१७ मध्ये गोंदिया तालुक्यात ५९७, तिरोडा ४२८, गोरेगाव २८६, आमगाव १६६, देवरी २१७, सालेकसा १२३, अर्जुनी-मोरगाव ६६९ व सडक-अर्जुनी ३५७ रूग्ण आढळले आहेत. या दोन्ही वर्षाच्या तुलनेत सन २०१८ मध्ये रूग्णांची संख्या कमी झाली आहे.हत्तीरोग होण्याची ही आहेत कारणेहत्तीरोग हा आजार वुचेरेरिया बॅक्रोटी या परोपजीवी जंतूमुळे होतो. या जंतूचा प्रसार क्युलेक्स जातीच्या मादी डासामार्फत होत असतो. हत्तीरोगाचे जंतू (मायक्रोफायलेरिया) हे मादी डासामार्फत त्वचेवर सोडले जाते. त्यानंतर जंतू स्वत: ५ जखम छिद्र शोधून आत शिरण्याचे काम करतात. दूषीत डास वारंवार चावल्यावर काही व्यक्तींनाच हत्तीरोग या आजाराची लागण होते. मादी जंतू लाखो लहान जंतूंना जन्म देते. ते रात्रीच्यावेळी रूग्णाच्या रक्तप्रवाहात फिरतात आणि नंतर डास चावल्याने दुसऱ्या व्यक्तीकडे प्रसारीत होते.या करा उपाययोजनाडासांची संख्या कमी करणे, घरासभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावे, मैला, घाण, कचरा यांची विल्हेवाट लावावी, सांडपाण्याचा योग्य निचरा करावा, घराभोवती कुठेही पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी, घरातील सर्व भांडी आठवड्यातून एकदा रिकामी करावीत, एक दिवस चांगले उन्हात वाळवावे. पाणी साठवलेले भांडी योग्य झाकून ठेवावीत. फुलदान्या, झाडांच्या कुंड्यातील पाणी व कुलरमधील पाणी नियमित बदलावे. मच्छरदाण्यांचा वापर करावा.हत्तीरोग नियंत्रणासाठी गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहेत. नागरिकांनी ह्या गोळ्या औषध समजून खावे, कोणतीही भिती बाळगू नये किंवा अफवांना बळी पडू नये. हत्तीरोग नियंत्रण मोहीमेला शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागाला सहकार्य करावे.-डॉ. वेदप्रकाश चौरागडेजिल्हा हिवताप अधिकारी, गोंदिया.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स