लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने आता थकबाकीदारांवर कारवाईचा फास आवळला असून गोंदिया परिमंडळात थकबाकीदारांविरोधात धडक मोहिम राबविली जात आहे. यांतर्गत आतापर्यंत २१६१ थकबाकीदारांची बत्ती गुल करण्यात आली आहे. या कारवाईमुळे मात्र थकबाकीदारांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.विकल्या गेलेल्या विजेच्या प्रत्येक युनिटची विजबिलाच्या माध्यमातून वसुली करून परत वीज विकत घेवून ग्राहकांना वीज पुरवठा करण्याची जवाबदारी महावितरण पार पाडत आहे. मात्र थकबाकीदारांमुळे महावितरणला अडचणींचा सामना करावा लागत आहे.महावितरणच्या गोंदिया परिमंडळात घरगुती ग्राहकांकडे १२ कोटी ४० लाखांच्या घरात थकबाकी पोहचली आहे. वाणिज्यीक ग्राहकांकडे ६ कोटी ६१ लाख औदयोगिक ग्राहकांकडे १ कोटी १७ लाख रूपयांची थकबाकी आहे. वीज बिलांचा भरणा करण्यासाठी महावितरणद्वारा ग्राहकांना आॅनलाईन पेमेंट, मोबाईल अॅप, एनी टाईम पेमेंट मशीन्स यासारख्या ग्राहकाभिमुख सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.ग्राहकांचा प्रतिसादही या सुविधांना चांगला मिळत चित्र आहे. वीजिबल वसुली, वीजचोरी पकडणे अशा अनेक कामात महावितरणच्या उर्जा अशा थकबाकीदारांमुळे खर्ची जात आहे. अशात ग्राहकांनी वीज बिल भरून सहकार्य करणे गरजेचे आहे.
२१६१ ग्राहकांची बत्ती केली गुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 00:46 IST
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने आता थकबाकीदारांवर कारवाईचा फास आवळला असून गोंदिया परिमंडळात थकबाकीदारांविरोधात धडक मोहिम राबविली जात आहे. यांतर्गत आतापर्यंत २१६१ थकबाकीदारांची बत्ती गुल करण्यात आली आहे.
२१६१ ग्राहकांची बत्ती केली गुल
ठळक मुद्देमहावितरणची धडक मोहीम : थकबाकीदारांना दिला दणका