लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : तालुक्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त आदिवासी भागातील ग्राम पंचायत जेठभावडाच्यावतीने जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत म्हणून १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्राम संसद जेठभावडा येथे स्वामी समर्थ नेत्रालय नागपूरच्या सहकार्याने नेत्र तपासणी व गरजू लोकांना मोफत चष्मे वाटप रविवारी (ता.२०) करण्यात आले.या शिबिराच्या माध्यमातून एखाद्याला डोळे देता येत नाही पण जग जसेच्या तसे रंग जसेच्या तसे दाखविता येते, अशी प्रतिक्रीया चष्मे वाटपानंतर लाभार्थ्यांनी दिली. नेत्र तपासणी व चष्मे वाटपाचे कार्य ग्राम संसद जेठभावडाच्या माध्यमातून पार पडले.यात आदिवासी गरीब जे लोक चष्मे विकत घेऊ शकत नाही अशा २०० लाभार्थ्यांना चष्मे वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील पहिल्या १४ व्या वित्त आयोग निधीतून पहिला प्रयोग साध्य करण्याचा बहुमान ग्राम संसद जेठभावडाला मिळाला आहे. या गावात लोकोपयोगी अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत.या कार्यात या गटाचे सरपंच डॉ. जितेन्द्र रहांगडाले यांनी आपल्या कार्यातून ग्रामस्थ व शासनाच्या माध्यमातून आदिवासी दुर्गम भागातील जनतेचा उध्दार करता येतो हे आपल्या या कार्यातून दाखवून दिले.यात सरपंच डॉ. जितेन्द्र रहांगडाले यांच्या खांदयाला खांदा लावून साथ देणारे ग्रामसेवक सुभेद बन्सोड व उपसरपंच भोजराज गावडकर, ग्राम पंचायत सदस्य शिला गावडकर, गीतांजली शहारे, कल्पना गावडकर, गोपाल कुंभरे, सुभ्रदा किरसान यांच्या सह सर्व गावकरी तसेच स्वामी समर्थ नेत्रालयाचे सहकारी डॉ.आय.झेड. मून, डॉ. निलेश मेश्राम, मोहन खराबे, कुणाल जेगंढे, सुहास नागपुरे व गावकºयांनी यांनी सहकार्य केले. ग्रामसेवक सुभेद बन्सोड यांनी आभार मानले.
२०० रूग्णांनी घेतला शिबिराचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 00:15 IST
तालुक्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त आदिवासी भागातील ग्राम पंचायत जेठभावडाच्यावतीने जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत म्हणून १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ....
२०० रूग्णांनी घेतला शिबिराचा लाभ
ठळक मुद्देजेठभावडा ग्रामपंचायतचा उपक्रम : नक्षलग्रस्त भागात नेत्र शिबिराचे आयोजन